सरकारी नोकरी करू इच्छिणा-या इच्छुकांसाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. केंद्र सरकारकडून आता विविध केंद्रीय विभागांमध्ये मेगाभरती करण्यात येणार आहे. लोकसभेत याबाबत केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 9.79 लाख पदे ही रिक्त असल्याने ही पदे भरण्याची घोषणा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत केली आहे.
10 लाख जागा भरणार
1 मार्च 2021 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांतर्गत 10 लाख 35 हजार 202 पदे मंजूर झाली होती. पण खर्च विभागाच्या एका अहवालाप्रमाणे एकूण 30 लाख 55 हजार 876 कर्मचारी आहेत. केंद्र सरकारमध्ये विविध रिक्त पदांवर भरती करण्याची जबाबदारी ही संबंधित मंत्रालयाची आहे. त्यामुळेच पुढील दीड वर्षांत मिशन मोड अंतर्गत 10 लाख कर्मचा-यांची नियुक्ती केली जाईल, असे जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत माहिती देताना सांगितले.
(हेही वाचाः Work from Home करायचंय? मग केंद्र सरकारने दिलीय आनंदाची बातमी)
सर्व विभागांत ई-कार्यप्रणाली लागू
तसेच केंद्र सरकारच्या सर्वच विभागांमध्ये ई-कार्यप्रणाली सुरू करण्यात आल्याचेही संसदेत सांगण्यात आले आहे. तसेच तक्रारी करण्यासाठीही ऑनलाईन पोर्टलची सुविधा देण्यात आली आहे. डिजिटल सचिवालयांतर्गत भारत सरकारकडून सर्व मंत्रालयातील विभागांमध्ये ई-कार्यप्रणाली लागू करण्यात आली असल्याचे जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community