मुंबईत कोविड प्रतिबंधक लस पुरवठ्यासाठी ९ कंपन्यांचे स्वारस्य

सर्व कागदपत्रांची छाननी करुन याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

125

मुंबईकरांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी १ जूनच्या अंतिम दिवसापर्यंत १० संभाव्य पुरवठादारांचा प्रतिसाद लाभला आहे. यापैकी एका पुरवठादाराने आधीच माघार घेतल्याने, आता संभाव्य ९ पुरवठादारांची छाननी करुन पुढील चार दिवसांमध्ये लस खरेदीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

या लसींचा पुरवठा करण्यास स्वारस्य

कोविड-१९ प्रतिबंधक लस पुरवठ्याबाबतच्या या जागतिक स्वारस्य अभिव्यक्तीस, यापूर्वी १८ मे व २५ मे रोजी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार आता अंतिम मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यात येत आहे. यामध्ये प्राप्त ९ संभाव्य पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी स्पुटनिक फाईव्ह या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखवले आहे. तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा देखील पुरवठा करण्यास स्वारस्य दाखवले आहे. तर अन्य एका पुरवठादाराने मान्यता प्राप्त लसींपैकी जी प्राप्त होईल, त्या लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखवले आहे.

(हेही वाचाः कोरोना चाचण्या घाटल्याबरोबर घटली रुग्ण संख्या!)

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार, तसेच उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी कोविड लस पुरवठा उपलब्ध करुन घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत.

महापालिका करणार छाननी

लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार व प्रत्यक्ष लस उत्पादित करत असलेल्या कंपन्या या दोहोंदरम्यान असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अवश्यक आहे. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होईल, याची खात्री पटेल व किती दिवसात लस साठा पुरवला जाईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या ४ मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन, महापालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सतत पाठपुरावा करत आहे. सर्व कागदपत्रांची छाननी करुन याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

(हेही वाचाः लस पुरवठा करण्यासाठी महापालिकेला चांगला प्रतिसाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.