मध्य रेल्वे मार्गावर धावणार ९० होळी विशेष गाड्या! पहा संपूर्ण वेळापत्रक

175

होळीनिमित्त अनेकजण गावी जातात त्यामुळे रेल्वे गाड्यांना अतिरिक्त गर्दी होते. मध्य रेल्वेने यापूर्वीच मुंबई ते सुरतकल दरम्यान ६ होळी विशेष चालवण्याची घोषणा केली आहे. दादर आणि बलिया/गोरखपूर दरम्यान ३४ होळी विशेष आणि नागपूर आणि मडगाव दरम्यान १० हॉलिडे स्पेशल गाड्या धावणार आहेत.

होळी विशेष ट्रेनचे तपशील खालीलप्रमाणे…

१. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर द्वि-साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (४ सेवा)

  • 01043 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २.३.२०२३ आणि ५.३.२०२३ (२ फेऱ्या) रोजी १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता पोहोचेल.
  • 01044 विशेष दि. ३.३.२०२३ आणि ६.३.२०२३ (२ फेऱ्या) रोजी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल.
  • थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.
  • संरचना : तीन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ४ द्वितीय श्रेणी आसन आणि ९ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये एक लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन.

२. पुणे – दानापूर साप्ताहिक होळी विशेष (२ सेवा)

  • 01123 विशेष गाडी दि. ४.३.२०२३ रोजी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसर्या दिवशी ०४.३० वाजता पोहोचेल.
  • 01124 विशेष दि. ६.३.२०२३ रोजी (१ फेरी) सकाळी ०६.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.
  • थांबे : दौंड कॉर्ड मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा.
  • संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन

३. पुणे – अजनी साप्ताहिक एसी सुपरफास्ट स्पेशल (६ सेवा)

  • 01443 विशेष दि. २८.२.२०२३ ते १४.३.२०२३ पर्यंत दर मंगळवारी पुणे येथून १५.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.५० वाजता अजनी येथे पोहोचेल.
  • 01444 विशेष गाडी दि. १.३.२०२३ ते १५.३.२०२३ पर्यंत दर बुधवारी अजनी येथून १९.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता पुण्याला पोहोचेल.
  • थांबे : दौंड कॉर्ड लाइन, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
  • संरचना : १३ तृतीय वातानुकूलित, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.

४. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव साप्ताहिक विशेष (६ सेवा)

  • 01459 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २६.२.२०२३ ते १२.३.२०२३ पर्यंत दर रविवारी २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसर्या दिवशी १०.३० वाजता पोहोचेल.
  • 01460 विशेष मडगाव येथून दि. २७.२.२०२३ ते १३.३.२०२३ पर्यंत दर सोमवारी ११.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
  • थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी.
  • संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ३ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ५ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

५. पुणे – करमळी साप्ताहिक विशेष (६ सेवा)

  • 01445 विशेष दि. २४.२.२०२३ ते १७.३.२०२३ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता करमळी येथे पोहोचेल.
  • 01446 विशेष गाडी दि. २६.२.२०२३ ते १९.३.२०२३ पर्यंत दर रविवारी ०९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी २३.३५ वाजता पुणे येथे पोहोचेल.
  • थांबे : लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
  • संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

६. पनवेल – करमळी साप्ताहिक विशेष (८ सेवा)

  • 01447 साप्ताहिक विशेष गाडी दि. २५.२.२०२३ ते १८.३.२०२३ पर्यंत दर शनिवारी २२.०० वाजता पनवेल येथून सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी ०८.३० वाजता करमळी येथे पोहोचेल.
  • 01448 विशेष गाडी दि. २५.२.२०२३ ते १८.३.२०२३ पर्यंत दर शनिवारी ०९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.
  • थांबे : रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.
  • संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.

आरक्षण : विशेष गाडी क्र. 01043, 01123, 01443/01444, 01459/01460 आणि 01447/01448 चे विशेष शुल्कासह बुकिंग दि. २४.२.२०२३ रोजी सुरू होतील आणि 01445/01446 साठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि www.irct.co.inc.in या संकेतस्थळावर आधीच उघडले आहेत.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.