धक्कादायक! प्रशिक्षणाविनाच पायलट उडवत होते विमान

159

विमान उडवणा-या वैमानिकांनी योग्य प्रशिक्षण घेतले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरी वाहतूक महासंचालनालयाने स्पाइस जेट विमान कंपनीच्या 90 वैमानिकांना बोइंग 737 मॅक्स विमान उडवण्यास मनाई केली आहे. डीजीसीएला वैमानिकांच्या प्रशिक्षणात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या सगळ्या वैमानिकांचे प्रशिक्षण नोएडा येथील एका केंद्रात झाले. या त्रुटींसाठी जबाबदार असणा-यांवर डीजीसीएने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वैमानिकांची संख्या खूप जास्त आहे

स्पाईस जेटचे 90 वैमानिक अप्रशिक्षित असल्याचे डीजीसीएला आढळून आले. बोईंग मॅक्स 737 च्या अपघातानंतर या विमानांच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. सध्या या कंपनीकडे बोईंग मॅक्स-737 विमान उडवणारे 560 वैमानिक पूर्णपणे प्रशिक्षित आहेत. सध्या स्पाईसजेटकडे बोईंग मॅक्स 737 ची 11 विमाने आहेत. या विमानोड्डाणांसाठी 144 वैमानिकांची गरज आहे. मात्र, कंपनीकडे 560 वैमानिक असून ही संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे कंपनीला विमानसेवा चालवताना कोणतीही अडचण येणार नाही.

( हेही वाचा: या जिल्ह्यात एसटी धावणार पूर्ण क्षमतेने, प्रशासन सज्ज! )

म्हणून ठेवण्यात आली पाळत

डीजीसीएने बोइंग 737 फ्लाइटवर पाळत ठेवली होती. कारण चीनमध्ये या कंपनीचे विमान कोसळले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून या अपघातानंतर तीन दिवसांनी इंडियन एअर लाइन्सच्या मॅक्स विमानांवर बंदी घातली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.