पाच दिवसांमध्ये मुंबईत इतक्या बाप्पांना निरोप

दीड दिवसांपासून ते पाच दिवसांपर्यंत आजवर एकूण ९० हजार गणेशमूर्ती आणि गौरींचे विसर्जन पार पडले आहे.

133

श्री गणरायांसह पाहुणचाराला आलेल्या गौरीला पाचव्या दिवशी भावपूर्ण वातावरणात भाविकांनी निरोप दिला. श्री गणरायांच्या आगमनानंतर गौरीचेही आगमन घरांघरांमध्ये झाले होते. त्यामुळे प्रत्येक घराघरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले. पाच दिवस गणपती बाप्पांची आणि गौरीची सेवा केल्यानंतर मंगळवारी त्यांना निरोप देण्यात आला. या गौरी-गणपतीच्या पाच दिवसांच्या एकूण ६६ हजार २९९ गणेश मूर्ती आणि गौरी मूर्तींचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत पार पडले. तर गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर दीड दिवसांपासून ते पाच दिवसांपर्यंत आजवर एकूण ९० हजार गणेशमूर्ती आणि गौरींचे विसर्जन पार पडले आहे.

(हेही वाचाः सार्वजनिक उत्सव मंडळांमधील उत्साह मावळतोय का?)

कृत्रिम आणि नैसर्गिक तलावांत विसर्जन

मुंबईत श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर रविवारी गौरींचे आगमन झाले होते. गौरींसह पाच दिवसांच्या गणरायांना मंगळवारी जड अंतःकरणाने भाविकांनी निरोप दिला. बाप्पांचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडले जावे यासाठी महापालिकेने नैसगिक विसर्जन स्थळांसह १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची सेवा उपलब्ध करुन दिली होती. त्यानुसार मंगळवारी या सर्व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ६५८ सार्वजनिक गणेश मूर्ती आणि ३० हजार ६३६ घरगुती गणेश मूर्तींचे, तसेच ३ हजार गौरींच्या मूर्तींचे विसर्जन पार पडले. उर्वरित सर्व गणेश मूर्ती व गौरींच्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक विसर्जन स्थळांवर पार पडले.

(हेही वाचाः मुंबईच्या महाराजांची मूर्ती कशापासून साकारली? वाचा…)

मंगळवारी बाप्पांना निरोप

मंगळवारी दिवसभरात रात्री उशिरापर्यंत या दोन्ही ठिकाणी पाच दिवसांच्या १ हजार १९६ सार्वजनिक, ५९ हजार १५३ घरगुती आणि ५ हजार ९५३ गौरी मूर्तींचे विसर्जन पार पडले. अशाप्रकारे एकूण ६६ हजार २९९ गणेशमूर्ती व गौरी मूर्तींचे विसर्जन पार पडले आहे.

(हेही वाचाः यंदा दीड दिवसांमध्ये २० हजार बाप्पांना निरोप नाही)

दीड दिवसांच्या ३९५ सार्वजनिक आणि ४० हजार ८६४ घरगुती व १८ हरतालिका अशाप्रकारे ४१ हजार २७७ मूर्तींचे विसर्जन पार पडले होते. त्यातील कृत्रिम तलावांमध्ये २८३ सार्वजनिक, २४ हजार २६९ घरगुती आणि १५ हरतालिका अशाप्रकारे २४ हजार ५६७ मूर्तींचे विसर्जन पार पडले होते.

(हेही वाचाः कृत्रिम तलावांकडे वळू लागले भाविक! दीड दिवसांच्या इतक्या मूर्तींचे विसर्जन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.