मुंबई महापालिकेकडे ९२ हजार ६३६ कोटींची मुदतठेवींची रक्कम!

119

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार ९४९ कोटी रुपये एवढा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एवढा मोठा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका ही एकमेव आहे. मोठा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेच्या मुदतठेवीमधील रक्कमही एवढी आहे की त्याची रक्कम पाहून अनेकांचे डोळे दिपून जातील. मुंबईचा जेवढा अर्थसंकल्पाचा आकार आहे, त्याचा दुप्पट महापालिकेच्या मुदतठेवी आहे. मुदतठेवींवरील व्याजामुळे जानेवारी २०२२पर्यंत या मुदतठेवींची रक्कम  ९२ हजार ६३६ एवढी झाली आहे.

मुदतठेवीची रक्कम

मुंबई महापालिकेकडे सध्या विविध बँकांमध्ये  कोट्यवधी रुपयांच्या मुदतठेवी आहे. मुदतठेवी व त्यावरील व्याज अशाप्रकारे  ही रक्कम आता  ९२ हजार ६३६ एवढी झाली असून, मुदत ठेवीच्या रुपात बँकांमध्ये आहे. महापालिकेमध्ये  जानेवारीमध्ये ८७ हजार १३१ एवढी मुदत ठेवीची रक्कम होती. परंतु जानेवारीमध्ये निव्वळ गुंतवणूक ५५०४.६० कोटी रुपये एवढी करण्यात आली. त्यामुळे ३१ जानेवारी २०२२ रोजी मुदतठेवीची अखेरची गुंतवणूक ही ९२ हजार ६३६ कोटी रुपये एवढी झाली आहे. विविध बँकांमध्ये ४४३ मुदतठेवींमध्ये वेगवेगळ्याप्रकारे रकमांच्या मुदतठेवी ठेवण्यात आल्या आहे. यामध्ये ७३० दिवसांपासून ते ३६५ दिवसांकरता मुदतठेवी ठेवण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: …तेवढा महाराष्ट्र एकवटणार, आदित्य ठाकरेंचा भाजपावर निशाणा! )

तर मुदतवाढीचा आकडा कमी होणार

मुंबईच्या महापालिकेने हाती घेतल्या ३१ प्रकल्प कामांसाठी एकूण  ९० हजार ३०९.६७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार आगामी वर्षांकरता १७९४२.९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर राखीव निधीमध्ये ५५ हजार ८०७ कोटी रुपये आहेत. हा पैसा प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. मात्र, मुदतठेवींमधील रक्कम ही कंत्राटदारांकडून स्वीकारण्यात आलेल्या अनामत रकमेच्या स्वरुपातील असून, कंत्राट कामे आणि त्यांचा दोष दायित्व पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्याकडून स्वीकारण्यात आलेली अनामत रकमेच्या स्वरुपातील रक्कम त्यांना परत करावी लागते. त्यामुळे मुदतठेवींची संख्या अधिक वाटत असली, तरी ज्याप्रकारे विकास कामे पूर्ण होती, त्याप्रमाणे ही रक्कम दिल्यानंतर मुदतठेवींचा आकडा भविष्यात आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.