Sharad Pawar यांच्या नावाने पोलीस हवालदाराची ९३ लाखांची फसवणूक

123
Fraud : पुण्यात गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची नऊ कोटींची फसवणूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भागीदारी असलेल्या कंपनीत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून मुंबई पोलीस दलातील ५७ वर्षीय हवालदाराची ९३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना मुंबईतील अंधेरी येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहार पोलिसांनी अपूर्व जगदीश मेहता (४८) विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विजय गायकवाड असे फसवणूक करण्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदार यांचे नाव आहे. गायकवाड हे मुंबई पोलीस दलाच्या विशेष शाखेत तैनात असून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कर्तव्य देण्यात आले आहे. २०२०पासून विमानतळावर तैनात असलेल्या गायकवाड यांना वरिष्ठांकडून अतिमहत्वाच्याच्या व्यक्तींना सौजन्याची वागणूक देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या, त्यात अपूर्व मेहता यांचा समावेश होता. अपूर्व मेहता हे नेहमी विमानाने प्रवास करीत असल्यामुळे गायकवाड हे आदेशानुसार त्यांना सौजन्याची वागणूक देत असे.

(हेही वाचा Dharavi मध्ये हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या; अंत्ययात्रेवरही दगडफेक; परिसरात तणावाचे वातावरण)

मेहता यांच्याशी विमानतळावर वारंवार होणाऱ्या भेटीमुळे गायकवाड आणि मेहता हे एकमेकांना चांगले ओळखू लागले. २०२१मध्ये मेहता हे दिल्लीला जात असताना गायकवाड यांना भेटले, दोघांमध्ये चर्चा होत असताना मेहता यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी आपले घनिष्ठ संबंध असून साहेबांच्या आदेशावरून मी एक कंपनी स्थापन करणार आहे, तुम्ही त्यात भागीदार होणार का? असा प्रश्न गायकवाड यांना विचारला. गायकवाड यांनी इच्छा नसल्याचे सांगून नकार दिला. २४ एप्रिल २०२१ रोजी गायकवाड यांची मेहता सोबत पुन्हा विमानतळावर भेट झाली, त्यावेळी देखील मेहता यांनी गायकवाड यांना कंपनीत भागीदार होण्याबाबत विचारून कंपनीची माहिती दिली, खूप विचार केल्यानंतर गायकवाड यांनी कंपनी संदर्भात चौकशी केली असता, त्याने सांगितले की, एक कंपनी आपल्या मुलीच्या नावाने सुरू करता येईल आणि दुसरी आपल्या मुलाच्या नावाने सुरू करता येईल, या कंपनीचे मुंबई, जयपूर, सातारा, गोव्यात व्यवसाय असेल त्यात शरद पवार (Sharad Pawar) स्वतः भागीदार असतील असे सांगून गायकवाड यांचा विश्वास संपादन केला. व्यवसाय सुरू करण्यासाठी १ कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, असे मेहता यांनी सांगितले.

हवालदार गायकवाड यांनी आपला नवी मुंबईतील फ्लॅट विकला, एलआयसीकडून कर्ज घेतले, भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढले, तसेच दागिने विकून ९३ लाख रुपयांची रक्कम एकत्र करून मेहता यांनी तीन ते चार टप्प्यात ही रक्कम दिली. मात्र मेहता याने कुठलीच कंपनी न उघडता गायकवाड यांची फसवणूक केली. अखेर गायकवाड यांनी सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अपूर्व मेहता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.