Operation Nanhe Ferishte अंतर्गत ९५८ मुलांची सुटका

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते”अंतर्गत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलींसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन फलाटांवरून सुटका केली आहे.

280
Operation Nanhe Ferishte अंतर्गत ९५८ मुलांची सुटका

रेल्वे सुरक्षा बलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” (Operation Nanhe Ferishte) अंतर्गत मुलांना गैरप्रकारांपासून वाचवण्याची जबाबदारीही ते योग्य पध्दतीने पार पाडत आहे. (Operation Nanhe Ferishte)

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते”(Operation Nanhe Ferishte) अंतर्गत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलींसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन फलाटांवरून सुटका केली आहे. यामध्ये चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली. झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे. (Operation Nanhe Ferishte)

काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पध्दती किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या (RPF) जवानांच्या निदर्शनास येत असतात. हे प्रशिक्षित आरपीएफ (RPF) कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतात. (Operation Nanhe Ferishte)

(हेही वाचा – Bengal : महिला कैदी गर्भवती होण्याचे प्रमाण वाढले; कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका)

इतक्या मुला-मुलींची सुटका 

मध्य रेल्वेवर एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ दरम्यान सुटलेल्या मुलांचे विभागनिहाय विभाजन खालीलप्रमाणे आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २८९ मुलांची सुटका केली असून त्यात १७५ मुले आणि ११४ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने २७० मुलांची सुटका केली त्यात १६९ मुले आणि १०१ मुलींचा समावेश आहे. पुणे विभागाने २०६ मुलांची सुटका केली असून त्यात १९८ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे. (Operation Nanhe Ferishte)

नागपूर विभागाने १३२ मुलांची सुटका केली असून त्यात ७६ मुले आणि ५६ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने ६१ मुलांची सुटका केली असून त्यात ३७ मुले आणि २४ मुलींचा समावेश आहे. मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी २०२४ मध्ये ३५ मुले आणि २१ मुलींसह ५६ मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात २७ मुलांची सुटका करण्यात आली आहे. (Operation Nanhe Ferishte)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.