मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेल्या ९६ टक्के रुग्णांनी केली ‘ही’ चूक!

मुंबईत ऑक्सिजन बेडवर असलेल्या १ हजार ९०० रुग्णांपैकी ९६% रुग्णांनी कोविड लसीकरणाची एकही मात्रा घेतलेली नाही. असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी स्पष्ट केले. जर तिसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण जास्त असेल आणि रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली तरच निर्बंध लावले जातील असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

( हेही वाचा : ५ राज्यांत निवडणुका : संजय राऊतांनी काय पाहिले स्वप्न? जाणून घ्या… )

९६ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले नाही

“मुंबईच्या १८६ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडवर दाखल असलेल्या ९६ टक्के रुग्णांचे लसीकरण झालेले नाही. आमच्याकडे २१ लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. संपूर्ण प्रौढ लोकसंख्येच्या लसीकरण मात्रेमध्ये आवश्यक ८४ दिवसांचे अंतर आहे. आमच्या लसीकरणाची टक्केवारी भारतात सर्वोत्तम आहे.” असे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. मुंबई महापालिकेने जवळपास एक कोटीहून अधिक लोकांना लसीकरणाचे दोन्ही डोस दिले आहेत. रुग्णालय, आरोग्य सेवांवर दबाव आल्यास आणि ऑक्सिजनचा वापर तीव्रपणे वाढला तरच तिसऱ्या लाटेत वाढीव निर्बंध लादले जातील. गेल्या १६ दिवसांत १९ मृत्यू झाले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले.

खबरदारी म्हणून ऑक्सिजन बेड

मुंबईत रुग्णसंख्या अधिक असली तरीही, फक्त १० टन ऑक्सिजन वापरला जात आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळी, महापालिकेजवळ पुरेसा ऑक्सिजन साठा नव्हता, परंतु यावेळी आमच्याकडे ४०० टन ऑक्सिजनचा साठा आहे. आरोग्य सेवेवर दबाव असेल तरच, निर्बंधांचा विचार केला जाईल. परंतु आज रुग्णालयातील ८४ % खाटा रिक्त आहेत आणि मुंबईत ६ जानेवारीला नोंदलेल्या २० हजार कोविड प्रकरणांपैकी फक्त खबरदारी म्हणून १०२ रुग्णांना ऑक्सिजन बेडवर ठेवण्यात आले होते, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here