Central Railway च्या दिवाळी आणि छट पूजेच्या सणांसाठी ९६ फेऱ्या

89
Central Railway च्या दिवाळी आणि छट पूजेच्या सणांसाठी ९६ फेऱ्या

रेल्वेने आगामी सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी मागणी लक्षात घेता तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दिवाळी आणि छट या सणांमध्ये ९६ सेवांसाठी मध्य रेल्वेने उत्सव विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. (Central Railway)

तपशील खालीलप्रमाणे आहेत…

लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर दैनंदिन विशेष (४२ सेवा)

01143 दैनंदिन विशेष दि. २२.१०.२०२४ ते दि. ११.११.२०२४ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दररोज १०.३० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल. (२१ सेवा)

01144 दैनंदिन विशेष दि. २३.१०.२०२४ ते दि. १२.११.२०२४ पर्यंत दानापूर येथून दररोज २१.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल. (२१ सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय श्रेणी (१८ डब्बे) (Central Railway)

(हेही वाचा – CC Road : अभिजित बांगरांचे आदेश, २४० दिवसांत सिमेंट काँक्रिटचे रस्ते पूर्ण करा!)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – आसनसोल साप्ताहिक विशेष (८ सेवा)

01145 साप्ताहिक विशेष गाडी दि. २१.१०.२०२४ ते दि. ११.११.२०२४ या कालावधीत दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ११.०५ वाजता सुटेल आणि आसनसोल येथे तिसऱ्या दिवशी ०२.३० वाजता पोहोचेल. (४ सेवा)

01146 साप्ताहिक विशेष गाडी दि. २३.१०.२०२४ ते दि. १३.११.२०२४ या कालावधीत दर बुधवारी आसनसोल येथून २१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०८.१५ वाजता येथे पोहोचेल. (४ सेवा)

थांबे: दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, सासाराम, देवरिया सदर, गया, कोडरमा, एनएससी बोस जे गोमो, धनबाद आणि कुल्टी.

संरचना : २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय श्रेणी (१८ डब्बे) (Central Railway)

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana Scam: ३० आधारकार्डचा गैरवापर करून लाटले लाडक्या बहि‍णींचे पैसे; साताऱ्यातील धक्कादायक प्रकार उघड)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर दैनंदिन विशेष (४२ सेवा)

01079 साप्ताहिक विशेष दि. २२.१०.२०२४ ते दि. ११.११.२०२४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज २२.३० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०८.२० वाजता पोहोचेल. (२१ सेवा)

01080 साप्ताहिक विशेष दि. २४.१०.२०२४ ते दि. १३.११.२०२४ पर्यंत दररोज गोरखपूर येथून १४.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (२१ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.

संरचना: २ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय श्रेणी (१८ डब्बे) (Central Railway)

(हेही वाचा – मी अजूनही राष्ट्रवादीचाच आमदार; Eknath Khadse यांचा खुलासा)

लोकमान्य टिळक टर्मिनस – संत्रागाची साप्ताहिक विशेष (४ सेवा)

01107 साप्ताहिक विशेष मंगळवार दि. २९.१०.२०२४ आणि दि. ०५.११.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून २०.१५ वाजता सुटेल आणि संत्रागाची येथे तिसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

01108 साप्ताहिक विशेष गुरुवार दि. ३१.१०.२०२४ आणि दि. ०७.११.२०२४ रोजी संत्रागाची येथून १५.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चकराधरपूर, टाटानगर आणि खरगपूर.

संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर व्हॅन (२२ डब्बे)

आरक्षण: उत्सव विशेष ट्रेन क्रमांक 01143, 01145, 01079 आणि 01107 च्या सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ०६.०९.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांनी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Central Railway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.