Spinal Surgery : कर्करोग आणि न्यूमोनियाग्रस्त ९९ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

महिलेच्या पाठीच्या कण्यात अस्थीभंग झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली

227
Spinal Surgery : कर्करोग आणि न्यूमोनियाग्रस्त ९९ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
Spinal Surgery : कर्करोग आणि न्यूमोनियाग्रस्त ९९ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या मणक्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

फुफ्फुसाचा कर्करोग आणि न्यूमोनियामुळे त्रस्त ९९ वर्षांच्या वृद्ध महिलेवर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. या महिलेच्या पाठीच्या कण्यात अस्थीभंग (fracture) झाल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली (Spinal Surgery). सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या असलदे गावातील महिलेवर ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, रुग्ण वृद्ध महिलेची प्रकृती ठीक आहे.

९९ वर्षांच्या मायावती तांबे अचानक घरी कोसळल्या. पाठीला मार लागल्याने त्यांना खूप वेदना होऊ लागल्या. कुटुंबीयांनी मायावती तांबे यांना उपचारासाठी मुंबईत आणले. मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झाले. तपासाअंती महिलेच्या पाठीच्या कण्यात अस्थिभंग झाल्याचे दिसून आले. पाठीच्या दुखण्याने त्यांना खूप वेदना होत होत्या. त्यांच्या मणक्यावर डॉक्टरांनी शस्रक्रिया करण्याचे ठरवले.

(हेही वाचा – Robert Vadra : रॉबर्ट वाड्रा यांच्या लंडन मधील १८कोटींच्या संपत्तीचा प्रश्न थेट ईडी च्या कोर्टात)

शस्त्रक्रियेतील आव्हाने –

कन्सलटंट एन्डोस्कोपिक स्पाईन सर्जन डॉ. मनीष कोठारी यांनी सांगितले की, मायावती तांबे यांना शस्त्रक्रियेपूर्वी काही आवश्यक चाचण्या करायच्या होत्या. त्यात रुग्ण महिलेला न्यूमोनिया आणि फफफुसाच्या कर्करोगाचे निदान झाले. शस्त्रक्रियेदरम्यान इतर आजार असल्याचे कळाल्याने शस्त्रक्रियेचा धोका अधिक वाढतो. डॉक्टर धोका पतकरत नाही. वय, इतर आजार आणि केवळ २६ किलो वजनामुळे रुग्ण महिलेच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. अगोदर न्यूमोनियावर उपचार घेण्याचे ठरले. न्यूमोनिया बरा होताच मायावती तांबे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.