दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात रेनट्री या इमारतीला १५ मजली इमारतीच्या १३ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी (२३ सप्टेंबर) सकाळी घडली.या आगीत ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Fire In Dadar) इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस दाखल झाले. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
ही आग इतकी भीषण होती की, आग लागलेल्या निर्माण धुरात श्वास गुदमरल्याने सचीन पाटकर या ६० वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला आहे.या घटनेतील जखमी व्यक्तींना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांवर बचावकार्य सुरू केले. मात्र या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
(हेही वाचा : New Company Registration : ऑगस्ट महिन्यात विक्रमी १५,३०० नवीन कंपन्यांची नोंदणी)
Join Our WhatsApp Community