अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ Veer Savarkar यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करूनच व्हावा; MP Medha Kulkarni यांचे आयोजकांना आवाहन

107
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ Veer Savarkar यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करूनच व्हावा; MP Medha Kulkarni यांचे आयोजकांना आवाहन
  • प्रतिनिधी 

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात यावा असे आवाहन खासदार मेधा कुलकर्णी (MP Medha Kulkarni) यांनी आयोजकांना केले. त्या म्हणाल्या की, 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या प्रतिमेला नियोजित संमेलन अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी माल्यार्पण करावे. त्यानंतरच संमेलनास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आयोजक मंडळीकडून आहे.

(हेही वाचा – सरकारी संगणकावर AI नको; केंद्र सरकारने जारी केले परिपत्रक)

सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलनानिमित्त दिल्लीमधील नवीन महाराष्ट्र सदनात मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली या विषयावर परीसंवाद आयोजित केला होता. खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार मेधा कुलकर्णी, शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद पाटील, भारतीय डाक विभागाचे संचालक सौरभ देशमुख आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे, पत्रकार सुनील चावके यांनी मराठी भाषा तसेच मराठी या विषयावर संवाद साधला.

(हेही वाचा – हिंदुत्ववादी वैभव राऊत मराठा मोर्चात बॉम्बस्फोट करणार होता, असे वक्तव्य केल्याप्रकरणी Jitendra Awhad यांच्यावर गुन्हा दाखल करा; ठाणे न्यायालयाचा आदेश)

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात यावा असे आवाहन खासदार मेधा कुलकर्णी (MP Medha Kulkarni) यांनी आयोजकांना केले. त्या म्हणाल्या की, 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रारंभी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या प्रतिमेला नियोजित संमेलन अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी माल्यार्पण करावे. त्यानंतरच संमेलनास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आयोजक मंडळीकडून आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.