हल्ली या आधुनिक युगामध्ये AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करण्याचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. जगभरातील मोठमोठ्या कंपन्या या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत. तसेच भारतातही या AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायला लागला आहे. पण याच्या परिणामस्वरूपी कितीतरी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कारण बहुसंख्य लोकांची कामे हे AI करत असल्याने अनेक कंपन्या आपल्या कामगारांना कामावरून कमी करत आहेत.
याचेच एक उदाहरण म्हणजे बंगळुरू येथील ‘दुकान’ नावाची ई-कॉमर्स कंपनी होय. हल्लीच सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार असे समजले की, बंगळुरू येथील दुकान नावाच्या कंपनीने आपल्या कंपनीतील नव्वद टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे आणि त्यांच्या जागी काम करण्यासाठी AI चॅटबॉट चा वापर सुरू केला आहे.
(हेही वाचा Indian Economy : भारताला होणार २० हजार कोटींचा नफा; कोणत्या निर्णयाचा होणार परिणाम? )
‘दुकान’ नावाच्या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, AI चॅटबॉटमुळे कंपनीला फार कमी भांडवल लावावं लागलं आहे. ज्यामुळे कंपनीचा खूप फायदा होत आहे. त्यासाठी आम्हाला आमच्या नव्वद टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. हा निर्णय कंपनीच्या प्रगतीच्या दृष्टीने योग्यच आहे. हा निर्णय घेणे फार कठीण होते परंतु कंपनीसाठी हे गरजेचे होते. कारण कंपनीचे जे काम करण्यासाठी दोन तास लागत होते ते काम आता तीन मिनिटांत होते. यामुळे कंपनीचा पुष्कळ वेळ वाचला आहे. म्हणून कंपनीने हा कर्मचारी कमी करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कंपनीच्या ग्राहकांच्या दृष्टीनेही योग्यच आहे. असं सुमित शाह यांचं म्हणणं आहे.
कंपनीच्या या निर्णयाला सोशल मीडियावर कित्येक लोकांनी विरोध दर्शवला आहे. पण दुकानच्या टीमने कर्मचाऱ्यांना कमी करण्यासोबतच वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये भरती असल्याचेही जाहीर केले आहे. या भरतीच्या जागा AI आणि प्रॉडक्ट्स डिझाईन डिपार्टमेंटमध्ये असतील असेही कंपनीने सांगितले.
Join Our WhatsApp Community