उत्तर प्रदेशातील येथील ‘जामिया हबीबिया मस्जिद-ए-आझम’ या मदरशामध्ये (Madrasa) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) ‘आतंकवादी’ असे वर्णन करणारे पुस्तक सापडले आहे. तपास यंत्रणा या मदरशात (Madrasa) बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणाचा तपास करत असतांना हे पुस्तक मिळाले. महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्रातही त्यांचे लेख प्रसिद्ध होतात.
काही आरोपी पाकिस्तानात पळून गेल्याचा संशय
२८ ऑगस्ट या दिवशी पोलिसांनी अतरसुईया येथील जामिया हबीबिया मशिदीच्या मदरशावर (Madrasa) धाड घातली होती, तेव्हा तेथे १ लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. घटनास्थळावरून बनावट नोटा छापण्यासाठी वापरले जाणारे यंत्रही जप्त करण्यात आले. पोलिसांनी महंमद अफजल, महंमद शाहिद, मौलवी महंमद तफसीरुल आरिफीन आणि जाहिर खान यांना अटक केली आहे. काही आरोपी अद्याप पसार आहेत. ते पाकिस्तानात पळून गेल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community