दहिसर पश्चिम येथील लक्ष्मण म्हात्रे रोड ते रंगनाथ केसरक मार्ग यांना जोडणाऱ्या मार्गावरील दहिसर नदीवर (Dahisar River) ६० फुट रुंदीचे पूल बांधले जाणार असून या पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह सुमारे २७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Dahisar River)
दहिसर पश्चिम येथील लक्ष्मण म्हात्रे रोड ते रंगनाथ केसकर यांना जोडणारा जोडणारा ६० फूट रुंदीचा रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याच्या रिव्हर व्हॅली सोसायटीच्या जवळील काही भागाचे काम पूर्ण असून उर्वरीत काही भाग विकसित केला जात आहे. तसेच उच्च न्यायालयानेही सप्टेंबर २०२१ रोजी मंजूर आराखड्यात नमुद केलेल्या उर्वरीत भागाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे दहिसर नदीचा (Dahisar River) भाग हा ६० फूट डी पी रोडचा एक भाग आहे. (Dahisar River)
(हेही वाचा – Chunabhatti Firing : चुनाभट्टी गोळीबारातील हल्लेखोराला मदत करणाऱ्या ज्वेलर्ससह आणखी दोन जणांना अटक)
२७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार
त्या अनुषंगाने ६० फूट रुंदीचा दहिसर नदीवरील (Dahisar River) पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामुळे नदीच्या बाजुच्या लोकांना तथा नागरिकांना तसेच आपत्कालिन घटना पडल्यास तेथे पोहोचण्यास फायदेशीर होईल असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी मागवलेल्या निविदेमध्ये स्पेको इन्फ्रास्ट्रक्चरल ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी विविध करांसह सुमारे २७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. (Dahisar River)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community