-
जयेश शत्रुघ्न मेस्त्री
जगाच्या पाठीवर हिंदू म्हणून ठामपणे उभं राहायचं असेल तर आपली कुटुंब व्यवस्था सुरळीत चालायला हवी. सध्याच्या युगात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आपली कुटुंब व्यवस्था डळमळीत होताना दिसत आहे. त्याचबरोबर हिंदू तरुणांमध्ये घटस्फोटाचे वाढते प्रमाण धोकादायक आहे. अशा परिस्थितीत सशक्त हिंदू पिढी निर्माण करुन जगात आपले मानाचे स्थान कसे निर्माण करायचे? हिंदू म्हणून मान वर करुन जगायचे असेल तर आपली लोकसंख्या जगाच्या तुलनेत प्रबळ असायला हवी. तसेच हिंदू जाती विविध क्षेत्रात पुढे जायला हवी. हिंदुंनी बक्कळ पैसे कमवून जागतिक अर्थकारण हाती घ्यायला हवे. सावरकरांचा हिंदुत्ववाद अशा सर्व घटकांवर आधारित आहे. त्यात कट्टरता नाही, तर सुयोग्य नियोजन आहे. सध्या आपल्याला जिकडे तिकडे वृद्धाश्रम दिसत आहेत. ही देखील चिंतेची बाब आहे. मुलं बाळं नसणं, लग्न न केल्यामुळे शेवटच्या दिवसात एकटं पडणं, कौटुंबिक वादामुळे वृद्धांना घर सोडावं लागणं, मुलं विदेशात कामाला असणं – अशा अनेक कारणांमुळे आयुष्याच्या संध्याकाळी लोक वृद्धाश्रमाचा आसरा घेतात.
‘मातृ देवो भवः, पितृ देवो भवः’ यावर आधारित आपली संस्कृती असल्यामुळे वृद्धाश्रम हा पर्याय तसा नावडताच. परंतु समान व्यवस्था असायलाच हवी. हा उदात्त हेतू समोर ठेवून स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था संचलित कै. देविदास फालक वानप्रस्थाश्रमाची (वृद्धाश्रम) स्थापना करण्यात आली आहे.
(हेही वाचा – पुण्यात NDAजवळ सापडले पाकिस्तानी चलन; सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित)
वृद्धाश्रम नको असे वाटत असले तरी ती आजच्या काळाची गरज आहे. या सर्व घटकांचा अभ्यास करुन स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्थेने वृद्धांसाठी किंवा ज्यांना मुलं-बाळं नाहीत अशांसाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर भुसावळ शहरातील दानशूर व्यक्तिमत्व कल्पना फालक आणि महेश फालक यांनी संस्थेला दिलेल्या जागेवर कै. देविदास फालक वृद्धाश्रमाची व्यवस्था केलेली आहे. मात्र हे वद्धाश्रम निर्माण करताना संस्थेचा मानस हिंदू संस्कृती बळकट करण्याचा आहे. यास वृद्धाश्रम न म्हणता वानप्रस्थाश्रम म्हणत आयुष्याची संध्याकाळ एकटे कुढत जगण्यापेक्षा अध्यात्मिक मार्गाने म्हणजेच संसारातून अध्यात्माकडे असा प्रवास करण्यासाठीच हे वृद्धाश्रम निर्माण करण्यात आले आहे. या वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आयुष्याच्या संध्याकाळी धर्म व राष्ट्र कार्याच्या प्रचार व प्रसारासाठी केला जाणार आहे. त्याचबरोबर नवीन पिढी घडवण्याकडे देखील लक्ष दिले जाणार आहे.
तसेच संस्थेच्या वतीने अध्यात्म केंद्र, गोशाळा, वृक्षरोपण, लघुउद्योग केंद्र व वाचनालय हे प्रकल्प देखील राबवण्यात येतात. संस्थेचे अध्यक्ष महेश फालक, उपाध्यक्ष प्रा. श्याम देशपांडे, सचिव व प्रकल्प प्रमुख गणेश वढवेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा प्रकल्पात वैयक्तिक सहभाग असतो. संस्थेतर्फे लघुउद्योग केंद्राद्वारे पापड, मसाले, विड्याच्या पानाचे तंबूल, भाकर व फराळाचे पदार्थ ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर उपलब्ध आहेत. लघुउद्योगाच्या माध्यमातून समाजातील कष्टकऱ्यांना एकत्र आणून त्यांच्या आर्थिक स्थितीत वाढ करणे हा उद्देश आहे. कारण हिंदू माणूस उद्योगी झाला पाहिजे. त्याचबरोबर सावरकरांनी गोपालनाचे महत्त्व सांगितलेले आहे. या अनुषंगाने गोशाळा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. तसेच कष्टाची भाकर योजनेंतर्गत भुसावळ शहरातील ज्येष्ठ, गरजू तसेच रुग्णांना व त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना स्वस्त दरात पार्सल स्वरुपात भोजन देऊन विशेष कार्य देखील सुरु आहे. संस्थेचे सचिव गणेश वढवेकर हे गेली अनेक वर्षे स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी ‘मृत्युंजय’ हे राष्ट्रभक्ती, अध्यात्म व विज्ञानाला समर्पित मासिक काढत आहेत. या मासिकाचे वितरण महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश इत्यादी राज्यांमध्ये होते. लक्ष्मी गणेश वढवेकर ह्या मासिकाच्या मुख्य संपादिका आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था अतिशय वेगळ्या विषयांना हात घालून काम करत असल्यामुळे हे विशेष कौतुकास्पद आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community