Vileparle : विलेपार्लेतील कॅप्टन गोरे उड्डाणपूल सेफ

260
Vileparle : विलेपार्लेतील कॅप्टन गोरे उड्डाणपूल सेफ
Vileparle : विलेपार्लेतील कॅप्टन गोरे उड्डाणपूल सेफ

विलेपार्लेतील कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास एक कंटेनर पुलाच्या खालील बाजूला ‘हाईट बॅरियर’ ओलांडण्याच्या प्रयत्नात अडकला. परिणामी, सदर ‘हाईट बॅरियर’ मोडून पडले आणि वाहतुकीचा खोळंबा झाला. ‘हाईट बॅरियर’चे नुकसान झाले असले तरी पुलाच्या संरचनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे पूल विभागाने स्पष्ट केले.

कंटेनरच्या धडकेनंतर महानगरपालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाचे तसेच पूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून मुंबई पोलीस तसेच मुंबई वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पर्यायी मार्गावरुन वाहतूक वळवण्याची कार्यवाही सुरु केली. त्याचप्रमाणे, महानगरपालिका प्रशासनाने गॅस कटरच्या सहाय्याने हाईट बॅरियरचे भाग वेगळे केले.

(हेही वाचा – ठाकरे गटाला महायुती देणार प्रत्युत्तर, ‘चोर मचाये शोर’, शनिवारी मुंबईत मोर्चा)

या कंटेनरच्या धडकेमुळे पुलासाठी लावलेल्या ‘हाईट बॅरियर’चे नुकसान झाले असले तरी, पुलाच्या संरचनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही. त्यामुळे पुलाला कोणताही धोका नसून पूलावरून वाहतूक सुरळीत सुरु आहे. कंटेनर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच, संबंधित कंटेनर चालकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यामुळे कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपुलाला कोणताही धोका नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.