गोरेगावमध्ये ज्येष्ठांसाठी Day Care Center आणि लहान मुलांचे पाळणाघर लवकरच होणार सुरु

775
गोरेगावमध्ये ज्येष्ठांसाठी Day Care Center आणि लहान मुलांचे पाळणाघर लवकरच होणार सुरु
  • सचिन धानजी,मुंबई

मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून गोरेगाव पश्चिम येथे सुरक्षित निवाऱ्याच्या सुविधेसाठी वसतिगृह उभारण्यात आले असून याला आता चांगल्याप्रकारे प्रतिसाद लाभत आहे. मात्र, या वसतीगृहांच्या इमारतीतील अन्य जागेमध्ये येत्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर (Day Care Center) सेंटर आणि लहान मुलांसाठी पाळणाघराची सुविधा खुली करून दिली जाणार आहे. (Day Care Center)

मुंबईत नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठीच्या पहिल्या वसतिगृहाचे लोकार्पण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ८ मार्च २०२४ गोरेगाव येथे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करून खुले करण्यात आले. या महिला वसतीगृहामध्ये आतापर्यंत सुमारे ५० हून अधिक महिलांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे नोकरदार महिलांचा प्रतिसाद लाभत असून या वसतीगृहाच्या देखभालीसाठी महापालिकेच्यावतीने परिवर्तन महिला संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेची ११ महिन्यांच्या कालावधीसाठी तसेच पुढे १० वेळा नुतनीकरण करण्यासापेक्ष मंजुरी देण्यात आली आहे. या संस्थेला महिलांसाठी काम करण्याचा १५ वर्षांचा अनुभव आहे. याठिकाणी भोजनाची व्यवस्था असून महिलांना राहण्यासाठी आकारलेल्या शुल्काव्यतिरिक्त जेवण आणि नाश्ता करता वेगळे पैसे मोजावे लागणार आहे. (Day Care Center)

(हेही वाचा – Eastern Freeway च्या डागडुजीच्या कामांमध्ये अडीच कोटींनी वाढ, संपूर्ण पुलाच्या कामांवर तब्बल ६८ कोटींचा खर्च)

या वसतीगृहात महिलांसाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था असून याच इमारतीच्या तळ मजल्यात आता लवकर ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर आणि नोकरदार महिलांना आपल्या मुलांना पाळणाघरात ठेवता यावे याकरता पाळणाघरही सुरु केले जाणार आहे. महिला वसतीगृह आणि ज्येष्ठ नागरिकांच्या डे केअर सेंटरचे (Day Care Center) प्रवेशद्वार स्वतंत्र असतील. महापालिकेच्या नियोजन विभागाच्या सहायक आयुक्त प्राची जांभेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महिलांच्या वसतीगृहाला आता चांगला प्रतिसाद मिळत असून याच्या देखभालीसाठी महिला संस्थेची नेमणूक केली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर आणि पाळणाघर सुरु करण्याचे प्रयोजनही असल्याने लवकरच याठिकाणी लोकांसाठी खुले करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरच त्याची तारीखही आयुक्तांच्या मंजुरीने जाहीर केली जाईल, असे जांभेकर यांनी स्पष्ट केले. (Day Care Center)

नोकरदार महिलांना कशाप्रकारे आकारले जाणार शुल्क
  • १ बेड असणाऱ्या व्यवस्थेसाठी मासिक उत्पनाच्या १५ टक्के किंवा ७५०० रुपये.
  • २ बेड असणाऱ्या व्यवस्थेसाठी मासिक उत्पनाच्या १० टक्के किंवा ५०००रुपये.
  • ३ बेड असणाऱ्या व्यवस्थेसाठी मासिक उत्पनाच्या ७.५ टक्के किंवा ३५०० रुपये.
  • ४ बेड असणाऱ्या व्यवस्थेसाठी मासिक उत्पनाच्या ५ टक्के किंवा २५०० रुपये. (Day Care Center)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.