सरळसेवा भरतीसंदर्भात होणार पुढील आठवड्यात निर्णय; शरद पवारांचे आश्वासन

राज्यातील सरळसेवा नोकरभरती संदर्भात राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रविकांत वरपे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. यावेळी राज्यातील भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत सरळसेवा भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

‘या’ विभागातील सरळसेवा नोकर भरती तातडीने सुरु करावी

राज्य शासनाच्या सरळ सेवा नोकर भरती प्रक्रिया धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हावेत, अशी राज्यातील लाखो युवकांची मागणी आहे. असे निवेदनात रविकांत वरपे यांनी म्हटले आहे. गृहनिर्माण विभागाची म्हाडा विभागाच्या परीक्षांची अंतिम भूमिका जाहीर करण्यात यावी, महाराष्ट्र शासनाची ग्रामविकास, महसूल, ऊर्जा, जलसंपदा, गृह व इतर विभागातील सरळसेवा नोकर भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात यावी, असे रविकांत वरपे यांनी निवेदनात म्हटले आहे.

( हेही वाचा: आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा; शिवसेनेची तारीख ठरली )

पवारांनी दिले आश्वासन

कोवीड 19 आपत्तीनंतर राज्य शासनाने राज्यातील नोकरभरती संदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. यामुळे परीक्षांची तयारी करणा-या युवकांमध्ये समाधानाची भावना आहे. आता पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून, या बैठकीत सरळसेवा भरतीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेईन, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले, असेही रविकांत वरपे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here