मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस ‘दख्खनची राणी’ (Mumbai-Pune Deccan Queen Express) म्हणून ओळखली जाते. ही एक्स्प्रेस नव्या डब्यांसह मुंबईत दाखल झाली आहे. भारतीय रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये डायनिंग कार फक्त डेक्कन क्वीनमध्येच आहेत.
( हेही वाचा : एकाच दिवसात एसटीचे तब्बल एवढे कर्मचारी झाले कामावर रुजू ! )
डायनिंग कार म्हणजे काय ?
डायनिंग कार म्हणजे हॉटेलप्रमाणे रचना केलेला डबा! या डायनिंग कारमध्ये ४० प्रवासी क्षमता आहे. या डब्यातील सर्व खिडक्या मोठ्या आकारातील असल्याने निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळताना जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. याठिकाणी प्रवाशांना विविध खाद्यपदार्थांचा लाभ घेता येणार आहे. आधुनिक किचनसह यात जेवणासाठी लाकडी टेबल – खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत.
अधिक जलद आणि सुरक्षित
आता ही एक्स्प्रेस लवकरच नव्या रंगरूपात दिसणार आहे. या गाडीला विशेष दर्जा असल्याने, रेल्वे प्रशासनाने सामान्य डब्याचा रंग न देता हिरवा व लाल रंग डब्यांना दिला आहे. डेक्कन क्विनही हेरिटेज रेल्वे असल्याने, अहमदाबाद येथील ‘एनआयडी’ने (नॅशनल इन्स्टिट्यूट डिझाइन) याचे आरेखन केले आहे. चेन्नई येथील कारखान्यात डेक्कन क्वीनचे डबे व डायनिंग कार तयार करण्यात आली आहे. पुणे-मुंबई मार्गावरील प्रवाशांच्या मनावर ९१ वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आता अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.
Join Our WhatsApp Community