विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रारुप प्रस्तावित धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणाला अंतिम स्वरूप देण्यासाठी आता जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात येत असून जनतेला याबाबत काही हरकती व सूचना असल्यास येत्या १० ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष विभागांत लेखी पत्राद्वारे नोंदवता येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या धोरणाच्या मसुद्यावर नागरिक व संस्था यांनी ३० दिवसांच्या आत म्हणजे १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुंबईकर नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनोरंजनासाठी महानगरपालिका अधिकाधिक सार्वजनिक मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. विकास नियंत्रण नियमावली २०३४ नुसार उद्याने/ मनोरंजन मैदाने/ खेळाची मैदाने व उपवने यासारखी आरक्षणे ठेवण्यात आलेली आहेत. मनोरंजन मैदाने व क्रीडांगणांचा विकास, देखभाल व दुरुस्ती ही स्थानिक संस्था, संघटना, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या सामुदायिक सामाजिक दायित्वातून करण्यासाठी मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत धोरण मसुदा महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तयार केला आहे.
धोरणाचा मसुदा पाहण्यासाठी याठिकाणी भेट द्या
हे धोरण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जावून www.portal.mcgm.gov.in> about BMC > Department Manuals > Gardens & Tree Authority > Docs याप्रमाणे पाहता येईल. तसेच त्याची थेट लिंक https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Gardens%20and%20Tree%20Authority/Docs/RG%20PG%20Adoption%20Policy%208.9.23.pdf ही आहे.
याठिकाणी जावून करा हरकती व सूचना
या धोरणाच्या मसुद्यावर नागरिक व संस्थांकडून तीस दिवसाच्या आत म्हणजे १० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. या हरकती व सूचना पाठविण्यासाठी ईमेल आयडी [email protected] असा आहे. तर कार्यालयीन पत्ता – उद्यान अधीक्षक यांचे कार्यालय, दुसरा मजला, हम्बोल्ट पेंग्विन इमारत, संत सावता माळी मार्ग, एच. पी. पेट्रोल पंपच्या बाजूला, मसीना रुग्णालयाजवळ, भायखळा (पूर्व), मुंबई ४०००२७ हा आहे.
Join Our WhatsApp Community