Food Court : वरळीतील क्लिव्हलँड जेट्टीवर ‘फूड कोर्ट’ उभारणार

वरळी कोळीवाड्यातील महिलांसाठी रोजगार निर्मितीचे साधन म्हणून मासळी सुकवण्यासाठी अत्याधुनिक असे सौर ऊर्जा आधारित ‘ड्रायर मशीन’ही पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे कमी वेळात मासळी सुकवण्याचा पर्याय उपलब्ध होईल.

1227
Food Court : वरळीतील क्लिव्हलँड जेट्टीवर ‘फूड कोर्ट’ उभारणार

वरळी कोळीवाड्यातील महिलांसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘फूड कोर्ट’ (Food Court) विकसित करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालन देण्यासाठी वरळीतील महिलांना ‘फूड ऑन व्हील’ वाहने पुरविण्यात येतील. क्लिव्हलँड जेट्टीवर महिलांसाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. (Food Court)

वरळी कोळीवाड्यातील (Worli Koliwada) स्थानिक नागरिकांच्या तसेच मच्छीमार बांधवांच्या विविध समस्या आणि तक्रारींबाबत पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गुरुवारी सायंकाळी वरळी कोळीवाड्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त (जी दक्षिण) संतोषकुमार धोंडे, संबंधित अधिकारी, स्थानिक नागरिक आणि मच्छीमार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. क्लिव्हलँड जेट्टीवर आवश्यक असणारे काँक्रिटीकरण करण्याच्या सूचना केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पतन अभियंता तसेच मत्स्योद्योग विभागाला दिल्या. तसेच ‘फूड कोर्ट’ (Food Court) विकसित करण्याच्या अनुषंगाने आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे निर्देश देखील त्यांनी महानगरपालिकेला दिले. (Food Court)

(हेही वाचा – MGNREGA Wages : मनरेगा अंतर्गत मिळणारा पगार तुटपुंजा, संसदीय समितीचा ठपका)

‘मोबाईल आयसीयू व्हॅन’ कायमस्वरूपी सेवेत ठेवणार 

वरळी कोळीवाड्यातील (Worli Koliwada) महिलांसाठी रोजगार निर्मितीचे साधन म्हणून मासळी सुकवण्यासाठी अत्याधुनिक असे सौर ऊर्जा आधारित ‘ड्रायर मशीन’ ही पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे कमी वेळात मासळी सुकवण्याचा पर्याय उपलब्ध होईल. तसेच मासळी साठवण्यासाठी शवगृहाची सुविधा पुरविण्यात येईल. वरळी कोळीवाड्यातील (Worli Koliwada) मासळी मंडईचे काम हे महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल, असेही केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. (Food Court)

त्यासोबतच वरळी किल्ल्यानजीक अद्ययावत सुविधांचे शौचालय विकसित करणे, नवीन रस्त्याचा पर्याय उपलब्ध करून देणे, नवीन आरोग्य केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानेही उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या. आरोग्याशी निगडित आपत्कालीन सेवेसाठी एक ‘मोबाईल आयसीयू व्हॅन’ या परिसरात कायमस्वरूपी सेवेत ठेवण्यात येईल, असे केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले. (Food Court)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.