भारताला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र जाहीर करा, या मागणीसाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात हिंदू राष्ट्र रॅली काढण्यात आली आहे. हिंदू धर्म जागरण समितीच्या वतीने नागपूरच्या पारडी परिसरात ही रॅली काढण्यात आली आहे.
परिसरातील शिवशक्ती हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालीसा पठण केल्यानंतर रॅलीला सुरुवात झाली. तरुण सहभागी झाले. जगात अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत. त्यामुळे भारतात बहुसंख्येने हिंदू असताना भारताला हिंदू राष्ट्र जाहीर करण्यात यावे, अशी मागणी रॅलीमध्ये सहभागी असलेल्यांनी केली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण हिंदू तरुण, तरुणी सहभागी झाले होते.