हलाल मांस विक्री दुकानाला हिंदू देवतेचे नाव; नागरिक संतप्त

133

गोव्याची राजधानी असलेल्या पणजीमध्ये एका मांस विक्री करणाऱ्या दुकानाला हिंदू देवतेचे नाव देण्यात आले होते.  नागरिकांच्या विरोधामुळे हा आक्षेपार्ह नामफलक आता हटवण्यात आला आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेला कंटाळून अखेर नागरिकांनी स्वतःहून हा बोर्ड हटवला. दरम्यान या घटनेवरून बराच वाद निर्माण झाला होता.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पणजीतील सांताक्रुझ परिसरातील हलाल मांस विक्री करणाऱ्या एका दुकानाला ‘जय भवानी’ असे नाव देण्यात आले होते. या नावावर हिंदू नागरिकांनी आक्षेप घेतला होता. याबाबत नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करुन 24 दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.

( हेही वाचा: सिद्धिविनायक मंदिर प्रकरण: मनसेचे बांदेकरांना थेट आव्हान; ‘हिंमत असेल तर… )

पोलिसांची निष्क्रीयता अधिक घातक 

त्यामुळे अखेर रविवारी नागरिकांनी दुकानावर धडक दिली. यावेळी दुकानातील कामगार आणि नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर मांस विक्री करणाऱ्या दुकानदाराने ‘जय भवानी’ नाव असलेला फलक उतरवला. मांस विक्री करणाऱ्या दुकानदाराच्या खोडसाळपणाहून पोलिसांची निष्क्रीयता अधिक घातक असल्याची प्रतिक्रीया स्थानिकांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.