मालाड (पश्चिम) भागातील मालवणी या मुसलमानबहुल भागातून पलायन करण्यासाठी हिंदूंवर (Hindu) दबाव आणला जात आहे. याठिकाणी हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, अशी व्यथा आम्रपाली शर्मा या महिलेने सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित करून मांडली आहे. याविषयी तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचेही आम्रपाली शर्मा यांनी सांगितले आहे.
View this post on Instagram
आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न
आम्रपाली शर्मा (Hindu) यांनी पुढे म्हणाल्या, मालवणी येथील त्यांचे राहते घर सोडून जावे, यासाठी मला विविध प्रकारे त्रास देऊन दबाव आणला जात आहे. माझ्या घराच्या दरवाज्यासमोर अतिशय घाणेरडे मांस टाकण्यात आले. याविषयी मी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेले होते; मात्र तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. माझ्यावर दबाव आणून मला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात आहे. मुसलमानांच्या त्रासाला कंटाळून मागे एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याविषयीही पोलिसांनी कारवाई केली नाही.
(हेही वाचा लैंगिक अत्याचार पीडितांची वैद्यकीय तपासणी केवळ महिला डॉक्टरांनीच करावी; Karnataka High Court चा निर्णय)
…तर धर्मांध मुसलमान कारणीभूत असतील
बकरी ईदच्या दिवशी सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात बकर्या कापण्यात आल्या. मला त्रास देण्यासाठी मुसलमान माझ्या घराच्या दरवाजाच्या पुढे येऊन दंगा करतात. त्यांच्या दरवाजापुढे कुणी दंगा केला, तर ‘अल्पसंख्यांकांना धोक्यात’, अशी ओरड केली जाईल. ‘तू मुसलमानबहुल भागात राहून चूक करत आहेस’, असे मला काही जणांनी सांगितले. हा देश धर्मनिरपेक्ष आहे, तर मग मला मुसलमानबहुल भागातून पलायन करण्यासाठी भाग कसे पाडले जाऊ शकते? धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंना (Hindu) जागा नाही का? भविष्यात माझे काही बरे-वाईट झाले, तर त्याला येथील धर्मांध मुसलमान कारणीभूत असतील, असे आम्रपली शर्मा म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community