Organ Donor : अवयव दात्यांच्या सन्मानार्थ ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’

रुग्णालयाने दिवंगत अवयव दात्यांना श्रद्धांजली वाहिली

144
Organ Donor : अवयव दात्यांच्या सन्मानार्थ 'द वॉल ऑफ रिमेंबरन्स'
Organ Donor : अवयव दात्यांच्या सन्मानार्थ 'द वॉल ऑफ रिमेंबरन्स'

नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात भारतीय अवयवदान दिनानिमित्ताने दिवंगत अवयव दात्यांचा सन्मान करण्यासाठी नुकतेच ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’ (स्मरण भिंतीचे) अनावरण केले. रुग्णालयाने दिवंगत अवयव दात्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सोबत रुग्णालयाचे युरोलॉजिस्ट प्रा. डॅरियस मिर्झा, डॉ. अमोल कुमार पाटील, डॉ. संजीवकुमार जाधव, डॉ. किरण शिंगोटे, डॉ. रवी शंकर आणि प्रादेशिक सीईओ संतोष मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्मरण भिंत लोकांना स्वयंप्रेरणेने अवयव दान करण्यास प्रोत्साहित करेल अशी आशा रुग्णालयाचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे यांनी व्यक्त केली. आपल्या प्रिय व्यक्तीचे अवयव दान करणे हा कुटुंबासाठी अत्यंत कठीण निर्णय असतो. एका दात्यामुळे ८ रुग्णांचे प्राण वाचू शकतात. याच कारणास्तव रुग्णालयातील १३७ हून अधिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे अवयव दान करण्या निर्णय घेतल्याचे मराठे यांनी सांगितले. अवयवदान ही जीवनाची अनमोल देणगी आहे. मी अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबियांच्या निस्वार्थ कार्याची प्रशंसा करतो.

(हेही वाचा – संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये जुंपली)

या स्मरण भिंतीमुळे भारतात अवयवदानाला प्रचंड चालना मिळेल अशी आशा नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केली. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले की नवी मुंबई पोलीसांनी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया वेळेवर पार पडावी म्हणून ग्रीन कॉरिडॉर वेळेवर तयार करण्यात तत्परता दाखवली आहे. आशा आहे की आमच्या प्रयत्नांमुळे प्रत्यारोपण करणाऱ्या शल्यचिकित्सकांना लोकांचे जीव वाचवण्यास वेळेवर मदत मिळाली. मला खात्री आहे की या ‘द वॉल ऑफ रिमेंबरन्स’ (स्मरण भिंतीमुळे) लोकांना अवयवदान करण्यास प्रोत्साहन मिळेल. लोकांनी जास्तीतजास्त अवयव दान करून गरजूना मदत करावी असे आवाहन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.