सरकारचा मोठा निर्णय; भारतात VLC Media Player अ‍ॅप सरकारकडून बॅन

134

VLC Media Player App Ban: भारतात व्हिएलसी मीडिया प्लेअर अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारकडून VLC Media Player अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. हे अॅप युजर्सचा डेटा चोरी करत असल्याचा आरोप होत होता, असे काही मीडिया रिपोर्टमध्ये बोलले जात आहे. त्यानंतर आता सरकारने या अॅपवर बंदी आणली आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अपल प्ले स्टोअरसारख्या साईटवरुन हटवण्यात आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी वेबसाईटवर बंदी

केंद्र सरकारने आयटी कायदा 2000 अंतर्गत VLC मीडिया प्लेयर आणि VideoLAN प्रोजेक्टच्या वेबसाईटवर बंदी घातली आहे. VLC मीडिया प्लेयर आणि त्याची वेबसाईट दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. मात्र, कंपनीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण VLC प्लेअरची वेबसाइट डाऊन आहे आणि डाउनलोड लिंकदेखील ब्लाॅक करण्यात आल्या आहेत. व्हीएलसी मीडिया प्लेअरची वेबसाईट ओपन केल्यावर आयटी अॅक्ट अंतर्गत बॅन केल्याचा मेसेज दिसतो.

( हेही वाचा: जळगावात ‘सैराट’: अल्पवयीन भावाने बहिणीसह प्रियकराला संपवलं )

याआधी अनेक चीनी अॅपवर घातलीय बंदी

VLC Media Player हे VideoLAN प्रोजेक्ट अंतर्गत फ्रान्समध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. भारत सरकारने या अॅपवर बंदी घातली आहे. त्यामुळे हे अॅप आता भारतात वापरता येणार नाही. VLC Media Player एसीटी फायबरनेट, व्हीआय यासारख्या इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांवरुनही हटवण्यात आले आहे. याआधी भारत सरकारने अनेक चीनी अॅपवर बंदी घातली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.