देव तारी त्याला कोण मारी ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. याचाच प्रत्यय आपल्याला रेल्वे स्थानकात नेहमी पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा याचा प्रत्यय अकोला रेल्वे स्थानकात आला आहे. रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे एका प्रवाशांचा जीव वाचल्याची घटना अकोला रेल्वे स्थानकावर घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विशेष म्हणजे या रेल्वे पोलिसाने यापूर्वीही दोघांचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळे संबंधित रेल्वे पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
विदर्भ एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन येथून रवाना होत असताना एक व्यक्ती रेल्वे गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेनमध्ये चढताना त्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील गॅपमध्ये पडत असताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर सतर्कपणे गस्त करणारे रेल्वे पोलीस स्टेशन अकोला येथील पोलीस कर्मचारी विलास पवार यांनी प्रसंगावधान दाखवून स्वतःचा जीव धोक्यात घालून सदर व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर खेचून घेऊन त्याचा जीव वाचविला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. विशेष म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्याने यापूर्वीही दोन वेळा असेच प्रवाशांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
(हेही वाचा – Spicejet Flight: धक्कादायक; प्रवाशाने केला हवाई सुंदरीचा विनयभंग; व्हिडीओ व्हायरल)
Join Our WhatsApp Community