गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोना रूग्णांचे आकडे वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर शुक्रवारी ७ एप्रिल रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे.
आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. या बैठकीत विविध राज्यातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
या राज्यांची स्थिती चिंताजनक
मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील सर्वाधिक जिल्हे रेड अलर्टवर आहेत. देशातील २१ राज्यांतील ७२ जिल्हे रेड अलर्ट अंतर्गत आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवडाभरात १२ ते १०० टक्के कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा साप्ताहिक संसर्ग १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे तेथे मास्क अनिवार्य केले जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून चीन आणि दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांवरून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करावी अशा सूचना टास्क फोर्सने राज्य सरकारला दिल्या आहेत. सध्या परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात येत आहेत. यातील पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येकाचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत. अशी माहिती देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community