विश्व विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचे गुरु आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते स्वर्गीय क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांचे स्मृती स्मारक दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj Park) उभारले जाणार आहे. पार्काच्या प्रवेशद्वार क्रमांक ५ जवळ उभारण्यात येणार आहे. पार्काच्या सुशोभीकरणाअंतर्गत आचरेकर (Ramakant Achrekar) सरांचे स्मारक बनवण्यात येणार आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj Park)
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (Shivaji Park) परिसरात प्रवेशद्वारालगत सुशोभीकरणाचा भाग म्हणून रमाकांत आचरेकर (Ramakant Achrekar) यांचे स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून झाल्याने या संदर्भात राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयात २३ जानेवारी २०२४ रोजी बैठक पार पडली. (Chhatrapati Shivaji Maharaj Park)
स्वर्गीय रमाकांत आचरेकर यांच्या स्मृतींचे स्मारक बनविण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. हे स्मारक भावी खेळाडूंसाठी अत्यंत स्फूर्ती देणारे ठरणार आहे. या वेळी सदर स्मारकाच्या बाबतीतील महत्त्वाचे सादरीकरणही पाहिले.
.
.
.#DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/pVMDyP6eCh— Deepak Kesarkar (@dvkesarkar) January 23, 2024
(हेही वाचा – Election Commission : लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला; केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतःच्याच पत्रावर केला खुलासा)
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, सहायक आयुक्त (जी उत्तर) प्रशांत सपकाळे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. (Chhatrapati Shivaji Maharaj Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community