मुस्लिम धर्मातील नमाज पठण ही धार्मिक कृती कायम वादात सापडली आहे. कारण, मुस्लिम धर्मीय अट्टहासाने रस्ते अडवून वा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने नमाज पठण करुन व्यवस्थेमध्ये अडथळा निर्माण करतात. याची परिसीमा गाठणारी घटना एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयामध्ये व्हायरल होत असल्याने, संतापाची लाट उसळली आहे.
आसन अडवून केले नमाज पठण
एका लोकल ट्रेनमध्ये मुस्लिम व्यक्ती चक्क आसनावर उभे राहून नमाज पठण करताना या व्हिडिओत दिसत आहे. धावत्या ट्रेनमध्ये या व्यक्तीने नमाज पठणाला सुरुवात केली. हल्ली असे प्रकार सर्रास होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. या मुस्लिम व्यक्तीने आपल्या आसनावर चादर अंथरुन त्यावर बसून नमाज पठण करायला सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर गाडी एका स्टेशनवर थांबल्यानंतर चढलेल्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा न देता, हा इसम आपलं नमाज पठण चालूच ठेवत असताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
एका लोकल ट्रेनमध्ये मुस्लिम व्यक्ती चक्क आसनावर उभे राहून नमाज पढताना आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. धावत्या ट्रेनमध्ये या व्यक्तीने नमाज पढायला सुरुवात केली. हल्ली असे प्रकार सर्रास होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.#Islam #Muslim #namaz pic.twitter.com/rZ4MUG1u7M
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 19, 2021
जाब विचारला तर अरेरावी करतात
नमाज पठणामध्ये उभे राहण्याची एक क्रिया आहे, त्यानुसार या व्यक्तीने धावत्या ट्रेनमध्येच तीन जणांच्या बसण्याच्या आसनावरच उभे राहून प्रार्थना करायला सुरुवात केली. ट्रेनच्या या आसनावर पाय ठेऊन उभे राहण्यास मनाई असताना, हा मुस्लिम व्यक्ती असे कृत्य करत आहे. अशा लोकांना जाब विचारला तर त्यांच्याकडून अरेरावी करण्यात येत असल्याचाही अनुभव आहे. असे काही प्रवाशांचे म्हणणे आहे.
( हेही वाचा: ‘कोविशील्ड’ बाबत नवा दावा, काय सांगतो अहवाल? )
Join Our WhatsApp Community