Islam : इस्लाममध्ये महिलांचा सन्मान होत नाही सांगत मुसलमान शिक्षिका बनली हिंदू

382

उत्तर प्रदेशातील बरेली भागात मुसलमान (Islam)  तरुणी तिचे कुटुंबीय विवाहित मुसलमान तरुणासोबत निकाह लावून देत असल्यामुळे मुसलमान तरुणीनी हिंदू धर्मात प्रवेश केला.

काय आहे हे प्रकरण? 

एका खासगी शाळेतील ३३ वर्षीय शिक्षिका नेहा असमत यांनी इस्लाममध्ये (Islam) महिलांना सन्मान मिळत नसल्याचे सांगत हिंदु धर्म स्वीकारला. उज्जैनमधील महाकालचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारल्याची घोषणा केली. नेहा असमत यांनी नेहा सिंह असे नाव धारण केले आहे. या शिक्षिकेच्या कुटुंबियांनी बारादरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत नेहाचे तिचा सहकारी शिक्षक मोहित सिंह यांनी अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. नेहा सिंह यांनी बरेलीचे पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे संरक्षणासाठी आवाहन केले असून, ‘मी आणि माझे मित्र मोहित सिंह यांच्या जिवाला धोका आहे’, असे त्यात म्हटले आहे. या पत्रात नेहा सिंह यांनी म्हटले आहे, ‘माझ्या कुटुंबियांनी माझा विवाह एका विवाहित मुसलमानाशी (Islam)  करून देण्याचा कट रचला होता. माझी याला असहमती होती. घरच्यांनी दबाव आणल्यावर मी घर सोडले. मोहित सिंह यांच्या विरोधात माझ्या कुटुंबियांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी माझ्या इच्छेने घर सोडले आहे आणि कोणत्याही दबावाविना सनातन धर्म स्वीकारला आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.