पोयसर चर्च, रघुलिला मॉलजवळील वाहतूक कोंडी फुटणार; त्या पादचारी पुलाच्या ठिकाणी उभारणार वाहतुकीचे पूल

कांदिवली पश्चिम येथील पारेख नगरमधील पादचारी पूल तोडून आता त्याठिकाणी वाहतुकीचे पूल उभारण्यात येणार आहे. हे पोयसर नदीवरुन जाणार असून ६० फुटाचे हे पूल आहे. यासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यासाठी कंत्राटदाराची नेमण्क करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे.

सुमारे ३० कोटींचा खर्च अपेक्षित

कांदिवली पश्चिम येथील पोयसर नदीवरील सध्याचे पादचारी पूल तोडून त्यावरून वाहतुकीसाठीचे पूल उभारले जाणार आहे. हा पूल नियोजित रस्त्यांने आरक्षित रस्त्याला जोडणारे आहे. या पुलाचे बांधकाम झाल्यास पोयसर चर्च ते रघुलिला मॉलपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडींतून सुटका होणार आहे. या पूलासाठी निविदा मागवण्यात आली असून त्यामुळे विद्यमान पुलाचे पाडकाम आणि नवीन वाहतूक पुलाचे काम आदींचा समावेश आहे. या कामांसाठी सुमारे ३० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतची निविदा २२ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे.

( हेही वाचा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष : त्या तीन दिवसांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून ३ हजार वृक्षांचे रोपण )

या भागात होणारी वाहतूक कोंडी आणि वाहतुकीची कनेक्टीविटी व्हावी याकरता स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्थानिक नगरसेविका तसेच इतर नगरसेवकांसह पूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत विद्यमान पादचारी पूल पाडून वाहतुकीचे पूल बांधले जावे अशी मागणी खासदारांनी केली हाती. या वाहतुकीच्या पुलासासाठी खासगी जागेचा वापर होणार असल्याने हे पूल बांधण्यास टाळाटाळ होत होता. परंतु खासदारांनी यावर सुवर्ण मध्य काढत जर संबंधित व्यक्ती यासाठी सहकार्य करण्यास तयार असेल तर वाहतुकीचे पूल उभारण्यास हरकत काय अशाप्रकारची भूमिका मांडली होती. त्यानंतर पुढील प्रक्रीया पार पाडून या वाहतुकीच्या पुल उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार याची निविदा मागवली असल्याने निविदा प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर पुढील दीड वर्षांमध्ये या पुलाची उभारणी होऊ शकेल असा विश्वास भाजपचे नगसेवक कमलेश यादव यांनी व्यक्त केला. हे पूल एस व्ही रोडला जोडले जाणार असल्याने या विभागातील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here