केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादसह मराठवाडावासीयांना रविवारी आनंदाची बातमी दिली आहे. औरंगाबाद ते पुणे दरम्यान नव्या द्रुतगती महामार्गाची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. 10 हजार कोटी रुपये खर्च करुन हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला जाणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर, औरंगाबादहून केवळ सव्वा तासातच पुणे गाठता येईल, असे गडकरींनी म्हटले आहे. सध्या औरंगाबादहून पुण्याला जाण्यसाठी 6 तास लागतात.
विविध कामे पूर्ण केले जाणार
जंबिदा लाॅन्स येथे रविवारी आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3 हजार 62 कोटींच्या प्रकल्पाचे तसेच, नगरनाका ते केंब्रिज स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण यासह औरंगाबाद ते पैठण रस्ता चौपदरीकरणाचे भूमिपूजन, दौलताबाद ते माळीवाडा, देवगाव रंगारी ते शिऊर यासह अन्य रस्त्यांचे भूमिपूजन झाले. यावेळी गडकरींनी 2024 पर्यंत 25 हजार कोटींची विविध कामे पूर्ण करु, असे सांगितले.
( हेही वाचा: आता विद्यार्थी शिकणार नाहीत ‘इस्लामिक साम्राज्याचा उदय’, धडे वगळले जाणार )
दृष्टीक्षेपात औरंगाबाद- पुणे द्रुतगती मार्ग
- बीड, पैठण, नगर भागातून जाणार
- मार्गाचा आराखडा पूर्ण
- कुठेही थांबा नसणार
- वाहनाचा वेग 140 किलोमीटर प्रतितास शक्य
- वेळेची मोठी बचत होणार