- प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाचा जिल्हा आहे. विविध उद्योगांची निर्मिती होत असून औद्योगिक दृष्टीने विकसित होत असल्याने याठिकाणी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण होत आहे त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे नवीन शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय सुरू संदर्भातील प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळ बैठकीत आणावा अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा – CM Cleanliness Campaign : शिंदेंच्या योजना फडणवीसांना अमान्य?)
मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून अधिक समृद्ध व्हावा, उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ आणि स्थानिक युवकांना तांत्रिक शिक्षण मिळून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मागणी केली आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळा बैठकीत ठेवावे. मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेनंतर यासाठी अधिक गती देऊन महाविद्यालय सुरू करण्यात येईल.
(हेही वाचा – Champions Trophy Squad : हार्दिक पांड्या, गिल नाही तर ‘या’ खेळाडूला उपकर्णधार म्हणून पसंती)
मंगळवारी मंत्रालयात चंद्रपूर जिल्ह्यात नवीन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, उपसचिव अशोक मांडे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community