विरार मधील तुळींजमध्ये उभारणार नवे पोलीस ठाणे; State Govt चा निर्णय

जमीन संपादनासाठी साडेतीन कोटींच्या खर्चास मंजुरी

34
विरार मधील तुळींजमध्ये उभारणार नवे पोलीस ठाणे; State Govt चा निर्णय
  • प्रतिनिधी

विरारमधील तुळींज येथे नवीन पोलीस ठाणे उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने (State Govt) घेतला आहे. यासाठी जमीन संपादित करण्याकरिता सुमारे ३ कोटी ५६ लाख ९७ हजार ५०० रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गृह विभागाने जारी केला आहे.

(हेही वाचा – Sansad बंद पाडणाऱ्या पक्षाकडून नुकसान भरपाई वसुली करावी; डॉ. निरगुडकरांचे परखड भाष्य)

वसई-विरार परिसरातील तुळींज पोलीस स्टेशन इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. गृह विभागाकडे या संदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतर राज्य शासनाने (State Govt) नवीन पोलीस ठाणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, नवीन पोलीस ठाणे उभारण्यासाठी जमीन संपादन करणे गरजेचे आहे. जमीन संपादनासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस महासंचालकांनी पत्रव्यवहार केला होता.

(हेही वाचा – Best Bus : खासगी बस चालकांची निष्ठा प्रवाशांऐवजी किलोमीटरशी; माजी विरोधी पक्षनेत्याचा आरोप)

त्यानुसार नवीन पोलीस ठाणे उभारण्यासाठी जमीन संपादन करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य सरकारने (State Govt) हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्यासाठी तुळींज येथील मैदानाचे आरक्षण बदलून सरकारी कार्यालयासाठी ३१८३ चौ. मी. जागा देण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागास सादर केला होता. नगर विकास विभागाने यांस मंजुरी देत, जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ३ कोटी ५६ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा निधी आवश्यक असल्याने सरकारने त्याला मंजूरी दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.