कोरोनाची टेस्ट केल्यानंतर, रिपोर्ट येईपर्यंत 5 ते 6 तास वाट पाहावी लागत होती. आता मात्र वाट पाहण्याची गरज नाही. पुण्यात कोव्हिस्विप्ट हे नवं यंत्र विकसित करण्यात आले आहे. यानुसार टेस्ट केल्यानंतर अवघ्या 40 मिनिटांत तुम्हाला तुमचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह की निगेटिव्ह हे समजणार आहे. पुण्यात विकसित झालेली ‘कोव्हिस्विप्ट’ ही जगातील सर्वाधिक जलद गतीने होणारी अचूक निदान रॅपीड टेस्ट आहे. जेमतेम 40 मिनिटांमध्ये 16 रुग्णांचे नमुने यात तपासता येतात. विमानतळ, रुग्णालय, ग्रामीण भागांमध्ये अशा सर्व ठिकाणी याचा प्रभावी वापर करता येतो. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मनुष्यबळ लागत नाही.
‘कोव्हिस्विप्ट’ कसे आहे?
- कोव्हिस्विप्टसाठी शितसाखळीची (कोल्ड चेन) व्यवस्था करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे मोठे फ्रिजर्स, त्याची वाहतूक हा त्रास यातून कमी होतो.
- टोस्टरच्या आकारातील एक छोटे मशिन विकसित केले आहे. त्यात कोरोना निदान चाचणी यशस्वी होते.
- विजेवर चालणाऱ्या या मशिनमध्ये रुग्णाचा कोरोना नमुना तपासण्यासाठी देण्याची व्यवस्था केली आहे.
- त्यातून 40 मिनिटांमध्ये कोरोनाचे अचूक निदान होते.
( हेही वाचा: 1925 मध्ये धावलेली पहिली मुंबईची इलेक्ट्रीक लोकल! कशी होती जाणून घ्या…)
निदान चाचणीत काय झाला बदल?
- मोठ्या प्रयोगशाळेची गरज नाही.
- शितसाळखी कालबाह्य झाली.
- मोठ्या प्रमाणात किट साठवणूक करण्याची आवश्यकता नाही.