विदेशातील दानशूरांच्या मदतीसाठी नोडल अधिकारी नियुक्त! 

परदेशातून आयात केलेल्या कोविड -19 मदत साहित्याच्या आयातीवर आयजीएसटीची सवलत केंद्र शासनाने जाहीर केली आहे. त्याकरता त्रास कमी करण्यासाठी, उद्योग विकास आयुक्त यांना नोडल आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

82

राज्यात कोविड-19 या आजाराचा प्रसार होत असतांनाच, राज्य शासन व त्यांच्या संलग्न संस्था तसेच राज्य शासनाच्या अधिकृत संस्था किंवा वैधानिक संस्था यासाठी मदत पुरविण्याचे कार्य करित आहेत. यासाठी बाहेरील देशातून कोविड-19 साठी मदत साहित्य पाठविण्यात येत आहे. विनामुल्य आयात केलेल्या मदतकार्याचा अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.


‘कोविड-19 रिलिफ आयटम’ सवलतीच्या उद्देशाने विनामूल्य आयातीची सोय करत असल्यास, त्यांना परदेशातून आयात केलेल्या विशिष्ट कोविड -19 मदत साहित्याच्या आयातीवर आयजीएसटीची सवलत केंद्र शासनाने जाहीर केली आहे. प्रशासकीय पुढाकाराचा जास्तीत जास्त परिणाम घडविण्यासाठी आणि कोविड दरम्यान त्रास कमी करण्यासाठी, उद्योग विकास आयुक्त यांना नियुक्त करण्यात आले आहे.

(हेही वाचा : दादर केले साफ… मुजोर फेरीवाल्यांमध्ये ‘नव्या’ अधिकाऱ्याची दहशत)

अशा आहेत अटी –

  • सदरची वस्तू विनामूल्य आयात केली जाऊ शकते आणि भारतात कोठेही विनामूल्य वितरण करण्यास अधिकृत केले जाऊ शकते.
  • आयातदाराने सीमाशुल्कांकडून वस्तू मंजूर होण्यापूर्वी त्या नोडल ऑथॉरिटीकडून माल कोविड रिलिफसाठी विनामूल्य वितरणासाठी आहे, असे प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे.
  • आयात झाल्यानंतर आयातदार, महाराष्ट्र राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांकडे आयात करण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीत आयात केलेल्या वस्तूंचे तपशील व त्या विनामूल्य वितरीत केल्याबाबत समर्थनीय कागदपत्रांच्या पुराव्यांसह एका स्टेटमेंटमध्ये सादर करावयाचे आहे. जेणेकरुन ते प्रमाणित करुन संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविले जाईल.
  • या  कागदपत्रांची व अटींची पूर्तता करण्याबाबत काही अडचणी असल्यास उद्योग उप संचालक अजयकुमार पाटील, यांच्याशी 9930410922 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन उद्योग संचालनालयाने केले आहे. नोडल अधिकारी यांचा संपर्क क्रमांक – (022) 22028616/22023584 तसेच ई-मेल  didci@maharashtra.gov.in असा आहे.


‘कोविड रिलीफ आयटमच्या’ आयातीसाठी कागदपत्रे सादर केल्यानंतर काही अटींच्या आधारे नोडल अधिकारी सवलत  प्रमाणपत्र देतील. यात 1. संस्थेचे नोंदणीप्रमाणपत्र, 2. चलन/खरेदी बील, 3. पॅकींग लिस्ट, 4. कार्गो तपशील, 5. देणगीदाराचे घोषणापत्र सादर करावयाचे आहेत. संबंधितांना सर्व तपशीलांसह आपला अर्ज didci@maharashtra.gov.in या ईमेलवर पाठविण्यात यावे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.