दलाल स्ट्रीट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवळील चौकात Jawaharlal Darda यांचा बसवणार अर्धपुतळा

103
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबईत सध्या कोणत्याही राष्ट्रपुरुषांचे तसेच इतर सेनानींचे पुतळे बसण्यास निर्बंध असून शहरातील मुंबई समाचार मार्ग व दलाल स्ट्रीट आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजजवळ जिथे छेदतात त्या चौकाला जवाहरलाल दर्डा (Jawaharlal Darda) असे नाव देण्यात आले आहे. या चौकात आता जवाहरलाल दर्डा यांचा अर्धपुतळा बसवला जाणार असून संबधित संस्थेने याची देखभाल, दुरुस्तीसह सुशोभिकरण आणि सुरक्षेची हमी घेतल्याने हा अर्धपुतळा बसण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Cabinet Decision: राज्य सरकार अमली पदार्थांच्या विरोधात कठोर पावले उचलणार; मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ निर्णय)

स्व. जवाहरलालजी दर्डा (Jawaharlal Darda) तथा बाबूजी याचा स्वातंत्र्य संग्रामातील भारत छोडो बांदोलन व भूदान आंदोलन यात मोलाचा सहभाग राहिला असून त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही उद्योग, उर्जा, क्रीडा व अन्य महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळून दिर्घकाळ लोकप्रतिनिधित्व केले आहे. जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारत सरकारने १०० रुपयांचे नाणे काढले बसून भारत सरकारच्या पोस्ट विभागाने ५ रुपयांचे पोस्टल तिकीव्ही जारी केले आहे.

(हेही वाचा – Accident : मध्यप्रदेशातील भिंड येथे भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू; 21 जण जखमी)

स्वतंत्रता सेनानी जवाहरलाल दर्डा (Jawaharlal Darda) यांचा ए’ विभागातील २२५ मधील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथील जवाहरलाल दर्डा चौकामध्ये अर्धाकृती पुतळा उभारणी करण्यासाठी संबंधित विविध विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. जवाहरलाल दर्डा (Jawaharlal Darda) यांचा अर्धाकृती पुतळा उभारणेकरीता लोकमत मिडिया लिमिटेड यांनी इच्छा व्यक्त केली असून शासन निर्णयातील पुतळा उभारणी संदर्भातील मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांनी विविध करारपत्र, शपथपत्र व अटींचे पालन तसेच पुतळा बांधणीचा खर्च, देखभाल दुरुस्ती करण्याचे मान्य केले आहे. उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची दैनंदिन परिरक्षण, सुरक्षा व पावित्र्य राखण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहिल या अटीवर हा पुतळा उभारण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतची कार्यवाही आता महापालिका ए विभागाच्यावतीने सुरु आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.