Milan Subway : तुंबणाऱ्या मिलन सबवेच्या ठिकाणी कायमस्वरुपी व्यवस्था, पण पंपांची मात्र भाडेतत्वावर

पश्चिम उपनगरातील मिलन सब वेच्या परिसरात पावसाळ्यात  तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत पाण्याची टाकी बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुंबणारे पाणी या टाकीत जमा करून आहोटीनंतर हे पाणी पुन्हा नाल्यात सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आता या टाकीला जोडणारी ९०० मि.मी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी टाकली जाणार आहे.

372
Milan Subway : तुंबणाऱ्या मिलन सबवेच्या ठिकाणी कायमस्वरुपी व्यवस्था, पण पंपांची मात्र भाडेतत्वावर
Milan Subway : तुंबणाऱ्या मिलन सबवेच्या ठिकाणी कायमस्वरुपी व्यवस्था, पण पंपांची मात्र भाडेतत्वावर
  • सचिन धानजी,मुंबई

पश्चिम उपनगरातील मिलन सब वेच्या (Milan Subway) परिसरात पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत पाण्याची टाकी बनवण्यात आली आहे. त्यामुळे तुंबणारे पाणी या टाकीत जमा करून आहोटीनंतर हे पाणी पुन्हा नाल्यात सोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु आता या टाकीला जोडणारी ९०० मि.मी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी टाकली जाणार आहे. मात्र, ही कायमस्वरुपी व्यवस्था केली जात असली तरी पावसाळ्यात या पाण्याचा जलदगतीने करण्यासाठी प्रत्येक वर्षी भाडेतत्वावर पंपांची अर्थात पंपिंग स्टेशनची व्यवस्था केली जाणार आहे. या पंपाच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. (Milan Subway)

मुंबईत पावसाळ्यात तुंबणाऱ्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे मिलन सब वे (Milan Subway) असून या ठिकाणी पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. मिलन सब वे (Milan Subway) सांताक्रुझ व विलेपार्ले या सिमेवर असून अंधेरीतील आझाद रोड, सांताक्रुझ पूर्व येथील सर्विस रोड, सांताक्रुझ पश्चिम येथील गोबर नाला, सांताक्रुझ पूर्व येथील रेल्वे लगत वाहणारा नाला तसेच रेल्वे रुळाच्या बाजुने वाहणारा नाला या सर्व भागात मुसळधार पावसात  पाणी जमा होऊन शेवटी मिलन सब वे येथून इर्ला नाल्याला मिळते. (Milan Subway)

(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : दादरच्या फेरीवाल्यांकडून दिवसभर राम नामाचा जयघोष; लाडू, प्रसाद आणि महाप्रसादाचे दिवसभर वाटप)

महापालिकेच्यावतीने ६ कोटी १० लाख रुपये खर्च 

मागील पावसाळ्यात मिलन सब वे (Milan Subway) येथील लायन्स क्लब च्या मैदानात भूमिगत टाकीचे काम हाती घेण्यात आले होते. मागील पावसाळ्यात या टाकीचे काम अर्धवट झाले होते. तरीही या टाकीत काही साचलेले पाणी त्या टाकीत सोडून  नजिकच्या नाल्यात नंतर सोडण्यात आले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या टाकीला मिलन सब वे पासून गुरुत्वाकर्षणादवारे पाणी टाकीत सोडण्याची व्यवस्था केल्यामुळे टाकीला जवळपास १ किलोमीटर पर्यंतचा भाग रिकामा राहणार आहे. त्यामुळे या  टाकीचा रिकामा राहणारा भाग भरण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार यासाठी नेमलेल्या तांत्रिक सल्लागाराचा सल्ला घेण्यात आला होता. या वेळी सल्लागाराने काही सूचना केल्या त्यामध्ये मिलन सब वे नाल्यापासून भूमिगत पावसाळी पाण्याच्या टाकीपर्यंत ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी टाकणे. तसेच ३००० घनमीटर प्रति तास क्षमतेचे प्रत्येकी ३ पंपांची सेवा २५ मे ते १५ ऑक्टोबर या सन २०२३ पासून २०२५ पर्यंत घेण्याची सूचना केली आहे. यासर्व सेवा घेण्यासाठी महापालिकेच्यावतीने ६ कोटी १० लाख रुपये खर्च केले जाणार आहे. (Milan Subway)

९०० मि.मी व्यासाच्या पर्जन्य जलवाहिनीसाठी सुमारे ८३ लाख रुपये खर्च येणार असून तीन वर्षांसाठी पावसाळ्यात ३००० घनमीटर प्रती तास क्षमतेचे तीन पंप भाडेतत्वावर घेण्यासाठी ५ कोटी २७ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्यावतीने मिलन सब वेच्या (Milan Subway) ठिकाणी कायमस्वरुपी व्यवस्था केली जात असताना तीन वर्षांतील प्रत्येकी पाच महिन्यांकरता पंपांची  सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सव्वा पाच कोटी रुपये खर्च केले जात असल्याने ही पंपिंगची सुविधाही महापालिकेला कायमस्वरुपी महापालिकेच्यावतीने करून घेण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे भाडेतत्वावर हे पंप घेऊन कंत्राट कंपनीचे भले करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. या कामासाठी महापालिकेने महाबुल इन्फ्रा इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड केली आहे. (Milan Subway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.