चंद्रपुरात दारुबंदीचा उच्च न्यायालय देणार का आदेश?

96

राज्य सरकारने सुमारे ७ महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतली. दारूबंदी मागे घेण्याच्या या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. यासंदर्भातील विविध जनहित याचिकांवर नागपूर खंडपीठात एकत्रितपणे सुनावणी होणार आहे.

नागपूर खंडपीठासमोर दाखल केली याचिका

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ नंतर दारूबंदी लागू करण्यात आली होती. ती दारूबंदी उठविण्याचा निर्णय २७ मे २०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सहा वर्षानंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठली आहे. राज्य शासनातर्फे गठित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त माजी प्रधान सचिव रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय अभ्यास समितीने दिलेल्या अहवालावरून सदर दारूबंदी उठविण्यात आली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, शेतकरी संघटनेचे नेते ॲड. वामनराव चटप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र नशाबंदी मंडळ, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, पुणे जिल्ह्यातील वसुधा सरदार, नगर जिल्ह्यातील रंजना गवांडे यांनीही महाराष्ट्रातील दारूबंदी हा विषय घेऊन याबाबत एक जनहित याचिका दाखल केली आहे. सदर याचिका उच्च न्यायालयाचे विधीज्ञ ॲड. उदय वारुंजीकर, ॲड. नितीन देशपांडे, ॲड. आशुतोष धर्माधिकारी यांच्या माध्यमातून दाखल करण्यात आली आहे. दारूबंदीसंदर्भात देवतळे समितीपासून झा समिती पर्यंत सर्वांनीच चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची शिफारस केली होती. त्यासोबतच जिल्ह्यातील ग्रामपंचायत, ग्रामसभांचा दारूबंदीबाबत प्रस्ताव असताना त्या विरोधात पाऊल उचलणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र सरकारने केवळ आर्थिक लाभ बघितला. महाराष्ट्र सरकारने काय करावे सदर याचिकेवर भाष्य करतांना सदर विषय हा नागपूर न्यायकक्षेत येतो त्यामुळे सदर याचिका नागपूर खंडपीठासमोर वर्ग करण्यात आली आहे.
 

दारुचा सर्वाधिक खप

दारूबंदी उठविल्यानंतर मागील पावणे सहा महिन्यात ९४ लाख ३४ हजार ४२ लिटर दारू दारुड्यांनी पोटात रिचविली असल्याचा आकडा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केला आहे. विदेशी दारूपेक्षा देशी दारूला मद्यप्रेमींची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सहा महिन्यात तब्बल ६१ लाख ७५ हजार ५११ लिटर दारूचा खप झाला आहे. तर विदेशी दारू १६ लाख ५८ हजार ५४२ लिटर खप झाला. बिअरला मात्र सर्वाधिक कमी पसंत करण्यात आले. बिअरचा खप अवघा १५ लाख ६४ हजार ४० लिटर ऐवढा आहे. बिअरच्या तुलनेत वाईनचा खप मात्र वाढला आहे. ३७ हजार ४४९ लिटर वाईनचा खप झाला आहे.

 ( हेही वाचा:आता हेच बाकी होतं! भंगारातील विमानात होणार प्री-वेडिंग फोटोशूट )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.