मुंबईत सापडला दुर्मिळ साप

पावसामुळे जंगलाबाहेर आल्याची शक्यता

रविवारच्या पावसानं मुंबईतील सरपटणा-या प्राण्यांना आता शहरी भागांत आणलंय. एरव्ही शहरी जीवनापासून लांब राहणारा डुरक्या घोणस ही प्रजाती अंधेरीतील महाकाली गुंफेजवळ सोमवारी आढळून आली. ही सापाची प्रजाती सहा वर्षानंतर मुंबईत आढळली आहे.

डुरक्या घोणस हा मुळात सह्याद्री पर्वत रांगेत दिसतो. मात्र मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सह्याद्री पर्वत रांगेचाच भाग आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून हा बिनविषारी साप अंधेरीच्या महाकाली गुंफेत आला असावा. रविवारी मुंबईत पाऊसही होता. त्यामुळे पावसाच्या पाण्यात हा शहरी भागांत आल्याची प्राथमिक शक्यता असल्याची माहिती ‘रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी दिली.

(हेही वाचा – एसटी संपाचा तिढा कायम! २० डिसेंबरला होणार पुढील सुनावणी)

मुंबईत सध्या बांधकामं वेगाने सुरु आहेत. त्यामुळे तुम्ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानजीकच्या बांधकाम क्षेत्राजवळ असाल तर एखादा सरटणारा प्राणी तुम्हांला दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही शर्मा म्हणाले. डुरक्या घोणस हा बिनविषारी साप वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार, चौथ्या वर्गवारीत संरक्षित आहे. हा साप अवैधरित्या जवळ बाळगणा-यास पंचवीस हजारापर्यंत दंड होऊ शकतो.


वन्यजीवांच्या बचावासाठी वनविभागाची हेल्पलाईन – १९२६

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here