फेब्रुवारी महिन्यात उष्णतेने मोडला 146 वर्षांचा विक्रम

मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात काय होईल अशी चिंता सर्वसामान्यांना सतावत आहे. फेब्रुवारी महिन्यात अचानक वातावरणात बदल झाला आणि वाढलेल्या उष्णतेने 146 वर्षांचा विक्रम मोडला आहे. फेब्रुवारी महिन्यात सरासरी 29.5 डिग्री तापमानाची नोंद झाली.

भारतात यंदा उन्हाळा खूप कडक असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही उन्हाळ्यात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. मार्च ते मे या काळात मध्य आणि लगतच्या वायव्य भारतातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वाढलेली आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान विशेषज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्वीट करत मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचा तापमानाचा अंदाज सांगितला आहे.

( हेही वाचा: महागाईचा आणखी एक फटका; LPG सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ )

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here