- प्रतिनिधी
राज्य शासनाने (State Govt) जखमी वन्य प्राण्यांसाठी अपंगालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आता मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, गडचिरोली येथे वन्यप्राण्यांसाठी निवारा केंद्र उभारली जाणार आहेत. सुमारे ८ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी यासाठी वितरित केल्याचा शासन आदेश महसूल व वन विभागाने गुरुवारी (१२ डिसेंबर) जारी केला.
(हेही वाचा – Debries On Call : राडारोडा संकलनापासून ते १२०० मेट्रिक टनाच्या डेब्रिजवर प्रक्रिया)
जखमी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी राज्यात उपचार केंद्र नाहीत. परिणामी अनेक वन्यजीव दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत, महत्त्वाच्या भागांत वन्य प्राण्यांसाठी अपंगालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. आता निवारा केंद्र उभारले जाणार आहेत. सुमारे ८ कोटी ६४ लाख ३४ हजार रूपयांच्या निधीची तरतूद केली आहे. अटी व शर्तींवर हा निधी वितरित केला जाईल. अपंगालयासोबत निवारे उभारताना, राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग होणार नाही. तसेच वित्तीय अनियमितता होणार नाही, याची खबरदारी विभाग स्तरावर घेण्याच्या सूचना महसूल व वन विभागाने दिल्या आहेत. (State Govt)
(हेही वाचा – ICC Women Championship : पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का; आयसीसीने ठोठावला दंड)
राज्य सरकारने (State Govt) अर्थसंकल्पात वन्य प्राण्यांसाठी अपंगालय उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अपंगालयाकरिता जागा निश्चित केल्या होत्या. तसेच निधीची तरतूद केली होती. या निधीपैकी कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी २ कोटी, नागपूरमधील उपवन संरक्षण (प्रा.) ५१ लाख, अहमदनगर उपवन संरक्षण (प्रा.) करिता ५ लाख, गडचिरोली उपवन संरक्षणाकरिता (प्रा.) ८ लाख ८० हजार, ठाणेमधील उपवन संरक्षण (प्रा.) ६० लाख, मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानकरिता १ कोटी ९५ लाख ५० हजार, जुन्नर वनपरिक्षेत्रातील जुन्नर, माणिकडोह बिबट निवारा केंद्र विस्तारीकरणासाठी पिंजरे ३ कोटी ४३ लाख २१ हजार रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community