Grant Road परिसरातील गृहसंकुलात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकजण गंभीर जखमी 

149
Grant Road परिसरातील गृहसंकुलात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकजण गंभीर जखमी 
Grant Road परिसरातील गृहसंकुलात इमारतीचा स्लॅब कोसळला; एकजण गंभीर जखमी 

मुंबईच्या ग्रँट रोड (Grant Road) परिसरातील एका इमारतीचा स्लॅब (Slab collapses) गुरुवारी (०३ ऑक्टोबर) कोसळला, या घटनेत काही जण जखमी झाले. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गुरवारी सकाळी 10 च्या सुमारास ग्रँट रोड परिसरातील शालीमार हॉटेलजवळील युनायटेड चेंबर्स (Grant Road United Chambers Slab collapses) येथील गृहसंकुलात घडली.

(हेही वाचा – Ind vs NZ Test Series : भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम साऊदीचा कर्णधारपदाचा राजीनामा)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळले. या घटनेनंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस, बेस्ट विद्युत विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी नाही.  मात्र, ढिगाऱ्याखालून सागर शिवाजी निकम (वय ६८) ही जखमी व्यक्ती आढळली असून त्यांना जे. जे. रुग्णालयात (J. J. hospital) दाखल करण्यात आले आहे. इमारतीमधील रहिवाशांकडून अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करत आहेत.     

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.