Deep Cleaning : झोपडपट्टी भागांमध्ये ‘या’ कारणांसाठी राबवली जाणार विशेष स्वच्छता मोहिम

मुंबईत सध्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेतंर्गत झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार आहे.

820
Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत
Mumbai Deep Cleaning : मुख्यमंत्री स्वच्छतेबाबत नाराज, सहायक आयुक्तांना दिले कारवाईचे संकेत

मुंबईत सध्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली असून या मोहिमेतंर्गत झोपडपट्टी परिसरातील स्वच्छतेवर अधिक भर दिला जाणार आहे. मुंबईतील इतर भागांसह झोपडपट्टी परिसरात (slum areas) राबवल्या जाणाऱ्या स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्यामागे प्रशासनाचा वेगळा दृष्टीकोन आहे. झोपडपट्टी परिसरातील (slum areas) अस्वच्छतेमुळे हा परिसर आधीच बकाल असतो, त्यात अस्वच्छतेमुळे अधिक बकाल दिसतो. या अस्वच्छतेमुळे या परिसरात आरोग्याचे प्रश्न उपस्थित होतात. तसेच या वस्त्यांमधून नाल्यात कचरा टाकला जात असल्याने नाले कचऱ्याने भरुन पाणी तुंबले जाते आणि परिणामी लोकांना तुंबणाऱ्या पाण्याचा प्रश्न उद्भवतो. शिवाय या नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो, यासर्व कारणांमुळे महापालिकेने आता झोपडपट्टी परिसराला (slum areas) विशेष टार्गेट करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती मिळत आहे. (Deep Cleaning)

झोपडपट्टी परिसर स्वच्छ करण्यावर विशेष भर

मुंबईत मोठ्याप्रमाणात स्वच्छता मोहिम हाती घेतली असून डिप क्लिनिंग (Deep Cleaning) अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या कामांमध्ये संपूर्ण स्वच्छतेवर भर दिला जाणार असला तरी झोपडपट्टी परिसरांवर (slum areas) विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. झोपडपट्टी परिसरात (slum areas) राबवणाऱ्या स्वच्छता ही अनेक कारणांमुळे तेथे राहणाऱ्या जनतेसह महापालिकेचा खर्च होणाऱ्या निधीकरता फायदेशीर असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Deep Cleaning)

(हेही वाचा – Narendra Modi: पंतप्रधान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार का? पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ काय म्हणाले? वाचा सविस्तर…)

सफाई कामगारांमध्ये शिस्त आणण्यासाठी नवी एसओपी

मुंबईतील स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी तसेच सफाई कामगारांमध्ये शिस्त आणण्यासाठी आता नव्याने एसओपी (SOP) बनवली जाणार आहे. या अंतर्गत आता स्वच्छतेच्या कामांवर विशेष भर दिला जाणार आहे. मात्र, झोपडपट्टी परिसरांत (slum areas) ही स्वच्छता विशेष राबवली जाणार आहे. झोपडपट्टीत स्वच्छता राबवल्यास स्थानिकांचा आरोग्याचा प्रश्न निकाली निघेल तसेच कचरा नाल्यात न टाकल्यामुळे पावसाळ्यात परिसर जलमय होण्याचा आणि पर्यायाने नालेसफाईच्या नावावर दरवर्षी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (Deep Cleaning)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.