महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. पत्रकार संरक्षण कायदा असतानाही अशा घटना घडत असल्याने हा विषय चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे. अशा स्थितीत या विषयावर गंभीरपणे चर्चा होऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे झाले आहे. पत्रकार संरक्षण कायदा काय आहे, त्यातील तरतुदी काय आहेत, कसा तयार झाला हा कायदा, या कायद्याचा उपयोग कोणाला होऊ शकतो, याची माहिती सर्वांना होणे आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये या संबंधीची माहिती देण्यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्याची तारीख आणि मेळाव्याच्या ठिकाणाची घोषणा लवकरच करण्यात येईल.
(हेही वाचा – Monsoon Update: राज्यात सरासरीच्या ८९ टक्केच पाऊस)
त्याअगोदर राज्यातील जिल्हा आणि तालुका स्तरावरील पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीवरील सदस्यांच्या नेमणुका जाहीर करण्यात येतील. हल्ला विरोधी कृती समितीच्या सर्व पदाधिका-यांना मेळाव्यास उपस्थित रहावे लागणार आहे, अशी माहिती राज्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community