Egypt मध्ये ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी समुद्रात बुडाली!

89
Egypt मध्ये ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी समुद्रात बुडाली!
Egypt मध्ये ४५ पर्यटकांना घेऊन जाणारी पाणबुडी समुद्रात बुडाली!

इजिप्तच्या (Egypt) हुरघाडा शहराच्या समुद्रकिन्याजवळ गुरुवारी (27 मार्च) सकाळी एक पर्यटक पाणबुडी बुडाल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत किमान सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर १४ जण जखमी झाले आहेत, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या पाणबुडीतून ३८ रशियन लोकांना वाचवण्यात आले आहे.त्यांच्यासह इतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Egypt)

हेही वाचा-Bangkok Earthquake : म्यानमार भूकंपाने हादरला ! इमारती कोसळल्या, बँकॉकमध्ये आणीबाणी

मिळालेल्या माहितीनुसार, पाणबुडीतील सर्वजण इजिप्तमधील प्रवाळ खडक आणि उष्णकटिबंधीय मासे शोधण्यासाठी निघाले होते, पण त्यापूर्वीच जहाजाला अपघात झाला. ही पाणबुडी समुद्रात 72 फूट खोलीपर्यंत गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप पाणबुडीचे अचानक बुडण्याचे कारण समोर आलेले नाही. सध्या याचा तपास सुरु करण्यात आला आहे.जखमींच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना घेऊन जाण्यासाठी २१ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. सिंदबात पाणीबुडीत एकूण ४४ प्रवासी होते. हे प्रवासी वेगवेळ्या देशांचे रहिवासी होते. (Egypt)

हेही वाचा- Crop Insurance : राज्यातील ६४ लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा! २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई मिळणार

दरम्यान, रशियन दूतावासाने फेसबुकवरील एका निवेदनात सांगितले की हे जहाज नियमित पाण्याखालील सहलीवर होते आणि त्यात अल्पवयीन मुलांसह ४५ रशियन पर्यटक होते. बहुतेक प्रवाशांना वाचवण्यात आले आणि त्यांना हॉटेल आणि रुग्णालयात नेण्यात आले, परंतु कोणत्याही गंभीर आरोग्य समस्या आढळल्या नाहीत. सध्या रशियन अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Egypt)

हेही वाचा- IPL 2025, LSG BT SRH : लखनौच्या विजयानंतर फ्रँचाईजी मालक गोयंका यांनी पंतला मारली मिठी

सिंदबाद पर्यटन पाणबुडी अनेक वर्षांपासून पर्यटकांना पाण्याखाली प्रवासाची संधी देते. लाला समुद्राच्या आत 25 मीटर म्हणजे 72 फूट खोलीवर अंतरावर जाण्याची क्षमत या सिंदबाद पाणबुडीमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी जगातील 14 मनोरंजात्मक पाणबुडींपैकी एक आहे. ही पाणबुडी फिनलँडमध्ये तयार करण्यात आली होती. या पाणबुडीमध्ये 44 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सना म्हणजे 46 जणांना समुद्रात नेण्याची क्षमता आहे. (Egypt)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.