- विशेष प्रतिनिधी, मुंबई
वरळीतील जलतरण तलावाला (Worli Swimming Pool) हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येत असून वरळी टेकडीवरील या जलतरण तलावाचे नामकरण आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव असे करण्यास मंजूरी प्राप्त झाली आहे.
वरळी जलाशय टेकडी नजिक महापालिकेच्यावतीने नव्याने जलतरण तलाव (Worli Swimming Pool) उभारण्यात आले आहे. हे जलतरण तलाव लोकांसाठी खुले करून दिले. हे जलतरण तलाव वरळी जलाशय टेकडी म्हणून ओळखले जात आहे. त्यामुळे या नव्याने बांधलेल्या जलतरण तलावाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव’ असे नाव देण्याची मागणी युवा सेनेचे सहसचिव मयुर कांबळे, वरळी सागरी कोळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अभिजित पाटील, तसेच विधान परिषद सदस्य सुनील शिंदे यांनी केली होती.
(हेही वाचा – Sharad Pawar यांचा उपस्थितीत महारावांकडून श्रीराम, स्वामी समर्थांचा अवमान; गुरुवारी राज्यभर आंदोलन)
त्यानुसार या नामकरणाचा प्रस्ताव महापालिकेपुढे मंजुरीला आले असता प्रशासकांनी याला मंजुरी देत पुढील प्रक्रियेसाठी पाठवले असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच या स्विमिंग पूलचे (Worli Swimming Pool) नामकरण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव असे केले जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. वक्तृत्वाबरोबरच बाळासाहेब ठाकरे भेदक लेखनही केले. ‘प्रबोधनकार ठाकरे’ व ‘प्रल्हाद केशव अत्रे’ यांचा प्रभाव त्यांच्या लेखनातून जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक-वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये होती. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र आहे, ज्यात संपादक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे अग्रलेख असत. झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती. झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉबेचे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. त्यामुळे या जलतरण तलावाला (Worli Swimming Pool) बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी या निवेदनाद्वारे उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community